घररायगडवाघजाई क्रीडा मंडळाने पटकावला हभप वै. मधुमाऊली चषक

वाघजाई क्रीडा मंडळाने पटकावला हभप वै. मधुमाऊली चषक

Subscribe

जय भवानी तरूण विकास मंडळाच्यावतीने आयोजित हभप वै.मधुबुवा माऊली समाज स्तरीय कबड्डी चषक वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी चिपळूण संघाने जिंकला. केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे(पनवेल) उपविजेता तर तृतीय क्रमांक कादवड क्रीडा मंडळ कादवड(चिपळूण) या संघास मिळाला.चतुर्थ क्रमांक कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे(चिपळूण) तर सर्वोत्कृष्ट खेळाडू वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी(चिपळूण) संघाचा साईराज कुंभार ठरला. उत्कृष्ट चढाई निखिल कदम केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे(पनवेल) तर उत्कृष्ट पक्कड शुभम शिंदे वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी(चिपळूण) तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून केदारनाथ क्रीडा मंडळ आकाश कदम तसेच शिस्तबद्ध संघ वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी(शहापूर) ठरला.

चौक: जय भवानी तरूण विकास मंडळाच्यावतीने आयोजित हभप वै.मधुबुवा माऊली समाज स्तरीय कबड्डी चषक वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी चिपळूण संघाने जिंकला. केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे(पनवेल) उपविजेता तर तृतीय क्रमांक कादवड क्रीडा मंडळ कादवड(चिपळूण) या संघास मिळाला.चतुर्थ क्रमांक कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे(चिपळूण) तर सर्वोत्कृष्ट खेळाडू वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी(चिपळूण) संघाचा साईराज कुंभार ठरला. उत्कृष्ट चढाई निखिल कदम केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे(पनवेल) तर उत्कृष्ट पक्कड शुभम शिंदे वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी(चिपळूण) तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून केदारनाथ क्रीडा मंडळ आकाश कदम तसेच शिस्तबद्ध संघ वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी(शहापूर) ठरला.

स्वच्छता अभियानाचे जनक 
वावंढळ येथील कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे नेते कै.जयसिंगराव तथा जे. आर.कदम यांचे पुत्र हभप. वै.मधुकर कदम हे उत्कृष्ठ कबड्डी खेळाडू तसेच गावच्या मंडळाचे ते सलग १५ वर्ष अध्यक्ष होते. वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी सतत फडकवत ठेवतानाच स्वच्छता अभियानाचे ते जनक ठरले. आपल्या सततच्या कार्यालयीन कामकाज करताना ते कोरोना काळात मृत्युमुखी पडले. त्यांची उणीव कधीही भरून येणार नसल्याचे राष्ट्रीय खेळाडू,अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

नीटनेटके आयोजन

नीटनेटके आयोजन करून या क्रिडा नगरीला राज्यस्तरीय दर्जा दिल्याचे चिपळूणचे आमदार शेखर निकम म्हणाले.यावेळी सातारा,रत्नागिरी,ठाणे,पालघर, रायगड जिल्ह्यातील समाजप्रेमी,खेळाडू उपस्थित राहून हभप. वै.मधुबुवा यांना आदरांजली वाहिली. मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, सरपंच सुहास कदम, चिपळूणचे माजी सभापती बळीराम शिंदे, विजय मोरे, दिलीप कदम, नितीन रायचुरा, सुधीर ठोंबरे, सुनिल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -