घररायगडउरणमध्ये महाविकास आघाडीपुढे भाजपचा दारुण पराभव

उरणमध्ये महाविकास आघाडीपुढे भाजपचा दारुण पराभव

Subscribe

उरण -: तालुक्यातील चिरनेर, दिघोडे आणि जासई या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास अघाडीच्या (win Mahavikas aaghadi) वादळापुढे भाजपचा दारुण पराभव (Big defeat for BJP)झाला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे भास्कर मोकल, दिघोडे थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे कीर्तिनिधी ठाकूर, तर जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे संतोष घरत विजयी झाले आहेत.

यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार डॉ.उद्धव कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन, तसेच तीनही ग्रामपंचायत हद्दीत शांतता राखण्याचे आवाहन केले.

  1. चिरनेर सरपंचपदाच्या निवडणुकीत मोकल यांना ३१२८, तर भाजपचे उमेदवार प्रतीक संजय गोंधळी यांना १२२४ मते मिळाली. चिरनेर ग्रामपंचायतीच्या १५ सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे १४ उमेदवार विजयी झाले असून, भाजपचे समीर डुंगीकर एक मताने विजयी झाले.
  2. दिघोडे सरपंचपदी महाविकास आघाडीचे ठाकूर यांना १२३७, तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे महेंद्र ऊर्फ मयूर घरत यांना ७९२ मते मिळाली. दिघोडे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यपदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले असल्याने भाजपाला सत्तेपासून दूर जावे लागले आहे.
  3. जासई सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीचे घरत यांना १९२५, तर भाजपचे बळीशेठ घरत यांना १८७३ मते मिळाली. ही निवडणूक अटीतटीची झाली. मात्र जासई ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यपदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे १२, तर भाजपचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -