घररायगडमहिलांनी सर केले वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड 

महिलांनी सर केले वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड 

Subscribe

येथील सह्यादी मित्र गिरीभ्रमण क्रीडा संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या भटकंती मोहिमेत शहर आणि परिसरातील १५ महिलांनी वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड ऊर्फ जननी दुर्ग सर करून आपणही गिर्यारोहणात मागे नसल्याचे दाखवून दिले.

महाड: येथील सह्यादी मित्र गिरीभ्रमण क्रीडा संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या भटकंती मोहिमेत शहर आणि परिसरातील १५ महिलांनी वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड ऊर्फ जननी दुर्ग सर करून आपणही गिर्यारोहणात मागे नसल्याचे दाखवून दिले.
महिलांमध्ये साहसी वृत्ती वाढावी आणि त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी ही संस्था त्यांच्यासाठी सुमारे १५ वर्षांपासून भटकंतीचे आयोजन करीत आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्षे यामध्ये खंड पडला. परंतु यानंतर आयोजित केलेल्या भटकंतीला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी किल्ले मोहनगडाच्या भटकंतीने पुन्हा याचा प्रारंभ करण्यात झाला. फार प्राचीन दळणवळणाचा मार्ग असलेल्या वरंध घाटाचा रक्षक म्हणून कावळा किल्ल्याच्या बरोबर हिरडस या किल्ल्याचा वापर होत असे.
निरा-देवघर धरणाच्या शिरगावकडील बाजूस असणार्‍या श्री जननी देवीच्या मंदिराजवळून महिलांनी दुर्ग चढाईला सुरुवात केली. अत्यंत खडतर वाटा आणि दमछाक होत असतानाही सुमारे दोन तासांनी समुद्रसपाटीपासून ३ हजार ६३० फूट उंचीवर असलेल्या मोहनगडाचा माथा या महिलांनी गाठला. देरडस मावळातील या दुर्गावरून विस्तीर्ण प्रदेश दृष्टीस पडतो. हा प्रदेश न्याहळतांना महिलांचा आनंद ओसंडून वाहत होता. ओस पडलेल्या हिरडस मावळातील या दुर्गाचे मोहनगड असे ठेवून अफझलखानाच्या स्वारीचे आणि खानाचे सैन्य अडवण्याची जबाबदारी बाजी पांडे यांना देण्यात आली होती. तसा आदेश बाजीप्रभू देशपांडे यांना महाराजांनी लिहीलेल्या तत्कालिन पत्रात आढळतो. असा हा महत्त्वाचा गड आणि त्यावरील शिखर या महिलांनी सर केले.
या मोहिमेचे नेतृत्त्व सह्याद्री संस्थेच्या मनीषा शेंडे आणि संध्या मौर्य यांनी केले. त्यांच्यासह प्रणाली पाटील, समृद्धी गुरव, डॉ. स्नेहा ठोंबरे, अंकिता पवार, डॉ. सपना कुडतरकर, श्रद्धा जोशी, श्रेया वैद्य, स्वप्नाली शिंदे, गौरी माने, श्रद्धा पाटील, रचना साळुंखे, प्रियांका गुजर, तसेच सेवानिवृत्त शिक्षिका सुलभा बागडे (६४) यांनी मोहनगड सर केला. किल्ला उतरल्यानंतर सर्वांनी निरा नदीचे उगमस्थान असलेला प्राचीन निर बावीला भेट दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -