घरक्रीडाAll England Badminton : लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत; प्रणॉय स्पर्धेतून आऊट 

All England Badminton : लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत; प्रणॉय स्पर्धेतून आऊट 

Subscribe

केंटो मोमाटाने एच. एस. प्रणॉयला पराभूत केले.

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्यने फ्रांसच्या थॉमस रूक्सेलचा २१-१८, २१-१७ असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारताच्याच एच. एस. प्रणॉयवर मात्र दुसऱ्याच फेरीत स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. त्याला जपानच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या केंटो मोमाटाने १५-२१, १४-२१ असे पराभूत केले. त्याआधी मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. युकी कानको आणि मिसाकी मात्सुटोमो या जपानच्या जोडीने त्यांच्यावर २१-१९, २१-९ अशी मात केली.

थॉमस रूक्सेलवर मात

लक्ष्यने मात्र पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अप्रतिम खेळ केला. त्याने फ्रांसच्या थॉमस रूक्सेलचा २१-१८, २१-१७ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ५३ मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या दोन्ही गेममध्ये रूक्सेलने लक्ष्यला चांगली झुंज दिली. परंतु, लक्ष्यने मोक्याच्या क्षणी त्याचा खेळ उंचावत हा सामना जिंकला.

- Advertisement -

सायनाचे आव्हान संपुष्टात

ऑल इंग्लंड स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डविरुद्धच्या या सामन्यात सायनाला चांगला खेळ करता आला नाही. तिने पहिला गेम ८-२१ असा गमावला होता. दुसऱ्या गेममध्येही ती ४-१० अशी पिछाडीवर होती. त्यानंतर मात्र दुखापतीमुळे तिला या सामन्यातून आणि स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -