घरक्रीडाअँथनी डायस यांना व्ही. पी. एम भूषण पुरस्कार

अँथनी डायस यांना व्ही. पी. एम भूषण पुरस्कार

Subscribe

महाराष्ट्रात अ‍ॅथलेटिक्समध्ये अग्रेसर असलेल्या व्ही. पी. एम. स्पोर्ट्स क्लब दहिसरचे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनात २०१८-१९ मोसमात खेलो इंडिया, राष्ट्रीय स्पर्धा तसेच राज्य स्तरिय स्पर्धांमध्ये पदक मिळवणार्‍या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मुलांमध्ये अनिरुद्ध अय्यर आणि मुलींमध्ये रश्मी शेरेगर यांनी या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गोळाफेकपटू पूर्णा रावराणेला १८ वर्षांखालील (मुलगी) सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तसेच मानाचा व्ही. पी. एम भूषण पुरस्कार अँथनी डायस यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे कार्यवाह सतीश उचील, आपलं महानगरचे संपादक संजय सावंत, न्यूरोसर्जन डॉ. आदिल छागला आणि पुण्यनगरीचे उपसंपादक जगदीश भोवड यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

- Advertisement -

व्ही. पी. एम. ने २०१८-१९ मोसमात राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरीय स्पर्धेत १०० सुवर्ण, ८५ रौप्य आणि ६८ कांस्य अशी एकूण २५३ पदके पटकावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -