घरदेश-विदेशधुळ्यातील काँग्रेसजनांच्या राहुल गांधींच्या सभेकडे नजरा

धुळ्यातील काँग्रेसजनांच्या राहुल गांधींच्या सभेकडे नजरा

Subscribe

आघाडीच्या जागावाटपात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. धुळे मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहणार आहे. धुळ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पक्षात ’ज्येष्ठ विरुद्ध तरुण’ असा संघर्ष उभा ठाकल्यामुळे काँग्रेस मोठ्या पेचात सापडली आहे. राहुल यांच्या १ मार्चच्या सभेमुळे पक्षांतर्गत वादावर तोडगा निघून पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असल्याने सर्व पदाधिकार्‍यांचे डोळे राहुल गांधींच्या आगमनाकडे लागले आहेत.

नाशिक लोकसभेच्या तिन्ही मतदार संघात भाजपा, शिवसनेचे खासदार आहेत. यामुळे येथे युतीच्या खासदारांच्या पराभवासाठी काँग्रेस आघाडी सज्ज झाली आहे. आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत नियोजन केले आहे. नाशिक मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ तर दिंडोरीसाठी शिवसेनेतून आलेले धनराज महाले यांची नावे निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान धुळे दौर्‍यावर येणार्‍या पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मालेगाव शहरात रोड शो करावे, अशी मागणी मालेगावच्या काँग्रेस समितीने केली आहे. त्यांनी या दृष्टीने नियोजनही सुरू केले आहे. यामुळे या दौर्‍यात बदल होऊन मालेगावला रोड शो होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ज्येष्ठ विरुद्ध तरुण
धुळ्यात काँग्रेसकडून माजी मंत्री रोहिदास पाटील आणि पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे या दोघात जोरदार रस्सीखेच असल्याचे चित्र आहे. रोहिदास पाटील यांचे वय ७८ असल्याचे कारण पुढे करीत यावेळी तरुण म्हणून डॉ. शेवाळे यांना संधी द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. तसा ठरावही पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला आहे. यामुळे जुने जाणते आणि निष्ठावंत असलेले रोहिदास पाटील व त्यांचे समर्थक नाराज आहेत. यापूर्वी अमरीश पटेल यांचे नाव चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी अमरीश पटेल आणि रोहिदास पाटील यांच्यात दिलजमाई झाली. अमरीश पटेल यांनी रोहिदास पाटलांना पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर पाटील व शेवाळे यांच्यातील रस्सीखेच सुरू आहे. हा वाद राहुल गांधी यांच्यासभेपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -