घरक्रीडाAUS VS PAK : ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत पाकिस्तानला लोळवलं अन् भारताला पुन्हा...

AUS VS PAK : ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत पाकिस्तानला लोळवलं अन् भारताला पुन्हा धक्का दिला

Subscribe

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमाकांवर आला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताना दुसरा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली आणि पहिल्या क्रमांक पटकावला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव करत पुन्हा एकदा भारताला धक्का दिला आहे. पाकिस्तान बरोबरच्या विजायाने ऑस्ट्रेलिया संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पुन्हा एकादा पहिल्या क्रमाकांवर आला आहे. (AUS VS PAK Australia thrashed Pakistan in Test series and shocked India again)

हेही वाचा – IND vs AFG : भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर; 19 खेळांडूंमध्ये कोणाला संधी?

- Advertisement -

सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर आठ विकेट राखून शानदार विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाची आठ कसोटी सामन्यांमध्ये विजयाची टक्केवारी आता 56.25 वर पोहोचली आहे. यापूर्वी केपटाऊन कसोटी जिंकल्यानंतर भारत पहिल्या क्रमांकावर होता, पण आता त्यांची विजयाची टक्केवारी 54.16 झाली असून ते आता 26 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर  आहेत.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटींचा धनादेश सुपूर्द

- Advertisement -

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये, 12 गुण विजयासाठी, 4 ड्रॉसाठी आणि 6 बरोबरीसाठी दिले जातात. त्यामुळे आता कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची शक्यता इंग्लंडविरुद्धच्या पुढील कसोटी मालिकेवर अवलंबून असेल. जर भारताने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर 3-1 किंवा त्याहून अधिक विजय मिळवला तर ते अंतिम फेरीत पोहोचतील. इंग्लंडविरुद्धची मालिका 3-1 ने जिंकल्यास किंवा 4-0 ने क्लीन स्वीप करण्यासाठी भारताला 62.5 किंवा 68.06 चा PCT मिळेल. तर पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाकडून कसोटी मालिकेतील पराभवामुळे 36.66 पीसीटीसह क्रमवारीत सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -