घरक्रीडाIND vs AFG : भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर; 19 खेळांडूंमध्ये...

IND vs AFG : भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर; 19 खेळांडूंमध्ये कोणाला संधी?

Subscribe

नवी दिल्ली : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानने 19 सदस्यीय संघाची घोषणा करताना इब्राहिम झद्रानकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तो भारताविरुद्धच्या द्विपक्षीय टी-20 मालिकेत पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (IND vs AFG Afghanistan squad announced for T20 series against India Who has a chance among 19 players)

हेही वाचा – Breaking Aditya L-1 : भारताचा सूर्यनमस्कार; आदित्य एल-1 पोहचले निर्धारित पॉइंटवर

- Advertisement -

अफगाणिस्तान संघ भारत दौऱ्यावर येणार असून टी-20 विश्वचषक 2024 दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. दोन्ही देशांमधील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 नोव्हेंबरला, दुसरा सामना 14 नोव्हेंबरला आणि तिसरा सामना 17 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर पाठीवर शस्त्रक्रिया झालेल्या संघाचा फिरकी अष्टपैलू रशीद खानचाही भारताविरुद्धच्या या मालिकेत समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

रशीद खानचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र तो खेळू शकेल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुजीब उर रहमानचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे, जो अलीकडेच युएई विरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाचा भाग नव्हता. तसेच युएई विरुद्ध राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलेल्या इकराम अलीखिलला बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात बढती देण्यात आली आहे.

हेही वाचा – INDIA : …तर पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार, तृणमूल काँग्रेसची भूमिका

टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा 19 सदस्यीय संघ

इब्राहिम झदरन (कर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, रशीद खान.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -