घरक्रीडाWTC Final हरल्यानंतर बीसीसीआय मोठा निर्णय घेणार? राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफला इशारा

WTC Final हरल्यानंतर बीसीसीआय मोठा निर्णय घेणार? राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफला इशारा

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023च्या (ICC World Test Championship 2023) अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला (Team India) पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. यानंतर भारताच्या माजी क्रिकेट पटूंसह चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठत आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याची मागणी होत आहे. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविडसह (Rahul Dravid) भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफला इशारा दिला आहे. (BCCI will take a big decision after losing the WTC Final? Warning to support staff including Rahul Dravid)

WTC फायनलमधील भारतीय संघाच्या कामगिरीनंतर एका वृत्तपकत्रात प्रकाशित झालेल्या बीसीसीआयच्या एका धिकाऱ्याच्या विधानानुसार एकदिवसीय विश्वचषक 2023 लक्षात घेऊन राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफला इशारा देण्यात आला आहे, मात्र फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांची चलबांगडी होण्याची चर्चाही सुरु झाली आहे.

- Advertisement -

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणे सोपं नाही. पण भारतीय संघाने दोनदा तो पराक्रम केला आहे. असे असले तरी विदेशी खेळपट्टीवर भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. पण वनडे विश्वचषकाला चार महिने बाकी आहेत. त्यामुळे आताच निर्णय योग्य नसले तरी राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफबाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

2023 च्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडबाबत निर्णय होणार?
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राहुल द्रविड 2023 च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा प्रमुख कोच म्हणून काम पाहणार आहे. आशिया चषक, टी-20 वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवानंतरही बीसीसीआयने राहुल द्रविडवर विश्वास दाखवला आहे. विश्वचषक 2023 नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. विश्वचषकातील संघाच्या कामगिरीनंतरच त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घायचा की नाही हे ठरवले जाणार आहे. परंतु आता विश्वचषकाला अवघे 4 महिनेही शिल्लक राहिले असल्यामुळे खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये आणि मोठे बदल केल्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडू नये, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ
मुख्य प्रशिक्षक – राहुल द्रविड
फलंदाज प्रशिक्षक – विक्रम राठोड
गोलंदाज प्रशिक्षक – पारस म्हाम्ब्रे
फिल्डिंग प्रशिक्षक – टी दिलीप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -