घरठाणेधर्मांतर प्रकरणी आता उत्तर प्रदेश सरकारने माफी मागावी - डॉ. जितेंद्र आव्हाड...

धर्मांतर प्रकरणी आता उत्तर प्रदेश सरकारने माफी मागावी – डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी

Subscribe

मुंब्रा येथे झालेल्या कथीत धर्मांतराबद्दल पोलिसांनी कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही, असे स्पष्ट केलेले आहे. त्यावरुन महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवून एका समाजाला बदनाम करुन त्याद्वारे दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याची तसेच मुंब्रा-कौसा बदनाम करुन आपणाला बदनाम करण्याचा हा कट होता. आता हा कट उघडकीस आला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने माफी मागावी तसेच महाराष्ट्र सरकारनेही आपली नाराजी उत्तर प्रदेशला कळवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. तसेच महाविकास आघाडी राज्यात २०० जागांवर निवडून येतील असा दावा ही त्यांनी यावेळी केला.

डॉ. आव्हाड म्हणाले की,  मुंब्रा येथे कोणत्याही प्रकारचे धर्मांतर झालेले नाही आणि तशी कोणतीही माहिती आम्हाला प्राप्त नाही, अशी घोषणा ठाणे पोलिसांनी केली आहे. ही आनंददायी घोषणा आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमधील अधिकाऱ्याने चारशे जणांचे धर्मांतर झाले, असे म्हटले. त्यामुळे ठाणे पोलिसांचीही लाज गेलेली आहे. मुस्लीमांबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी हिंदू समाजाला वेगळी दिशा दाखवण्यात आला. त्यातून दोन्ही समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा उद्देश होता. हिंदू समाज काय एवढा अरिपक्व आहे की तो धर्मांतराचा रस्ता निवडेल. ही महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवून एका समाजाला बदनाम करुन त्याद्वारे दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याची तसेच मुंब्रा-कौसा बदनाम करुन आपणाला बदनाम करण्याचा हा कट होता. पण, पहिल्या तासातच आपण आव्हान दिल्याने कोणाला काही करता आले नाही अन् त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे राज्य सरकारने हे गांभीर्याने घ्यावे. तसेच, उत्तर प्रदेशने माफी मागायला हवीच शिवाय ठाणे पोलिसांनीही उत्तर प्रदेश सरकारला एक नाराजीचे पत्र उत्तर प्रदेश सरकारला पाठवायला हवे की तुम्ही असे बेजबाबदार वर्तन तुम्ही करु शकत नाही, असे ठणकावायला हवे. आज मुंब्रा परिसर हा ठाण्यातील कोणत्याही भागापेक्षा चांगला आहे. म्हणजे कळवा-मुंब्रा भागाची सुंदर प्रगती होत आहे. ही प्रगती बघवत नसल्यानेच हे षडयंत्र रचण्यात आले.

- Advertisement -

हा दंगल पेटवण्याचा कट होता का, असे पत्रकारांनी विचारले असता, हा दंगल पेटवण्याच्या कटाचा एक भाग होता. येथील एका समाजाची प्रतिमा राक्षस अशी उभी करुन त्याचे भय निर्माण करायचा प्रकार सुरु झाला होता. हा प्रकार अत्यंत खालच्या स्तरावरील आहे. महाराष्ट्रामध्ये जेथे कधी दगड उचलला गेला नाही. तिथे दंगली घडविण्यात आल्या आहेत. ज्या कोल्हापूरवर छत्रपती शाहू महाराजांचे संस्कार आहेत; जिथे सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकसंघ ठेवून नगर उभारले. तिथे दगड उचलले जात आहेत. आज वाईट वाटते की तिथे पानसरे-एन.डी. पाटील नाहीत; ते दोघे असते तर त्यांनी रस्त्यावर उतरुन शांतता निर्माण केली असती, असे डॉ. आव्हाड म्हणाले.

शहानवाजच्या अटकेसंदर्भात विचारले असता,  जर कोणी दोषी असेल तर त्याला फासावर चढवा. पण, एका प्रगतशील शहराला बदनाम का करत आहात. चारशे जणांच्या नावाने सबंध शहर बदनाम कसे काय करु शकता? गेल्या 20 वर्षात विशेषत: सन 2009 पासून येथे कधीच जातीय तणाव निर्माण झालेला नाही. मुंब्रा-कळव्याचा जो विकास झालेला आहे. त्यामुळेच तेथील लोक आपणावर प्रेम करीत आहेत. तेथील नागरिक आणि आपली बांधिलकी आहे. हेच विरोधकांना झेपत नाही. त्यामुळेच कसेही करुन मला रोखण्यासाठी ही बदनामी केली जात आहे. त्यासाठी गुन्हे दाखल करा; खोटÎा बातम्या पसरवा असा प्रकार केला जात आहे. पण, आता सत्य बाहेर आलेच नाही. पाच दिवसांनी पोलिसांनी खरे काय ते सांगितले ना! आम्ही यादीच मागितली होती. पण, पोलीस वेळ काढत होते. गाझीयाबाद पोलिसांचे म्हणणे रेटत होते. जर, या पोलिसांसमोर असे धर्मांतर झाले असेल तर ते पोलिसांचेच अपयश आहे. त्यावर बोला ना! जर तुमची चूक नाही तर ते थेट बोला ना. या बाबत आपण गृहमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी उत्तर प्रदेश सरकारला आपली नाराजी कळवण्याबाबत सांगणार आहोत, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या 200 जागा येणार
सर्व्हे काय सांगतात हे माहित नाही. पण, आपण राज्यभर फिरत आहोत. जे पाहतो ते सांगतो की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 200 जागा आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच दंगली , अफवा पसरविल्या जात आहेत. विकासकामे नाहीत, बेरोजगारी- महागाई वाढली आहे. राज्यात अस्थिरता वाढली आहे. म्हणूनच नको त्या अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या सर्व्हेनुसार आम्हाला 200 जागा मिळणारच आहेत.

भारताची अब्रू वेशीवर टांगली
ट्वीटरला सरकारने खडसावले होते, त्यावर ते म्हणाले की, असा प्रकार उघडकीस येणे म्हणजे लोकशाहीप्रधान, प्रगतशील देशाची अब्रू वेशीवर टांगण्यासारखे आहे. लोकशाही मानणारा देश अशी भारताची ओळख पुसून टाकली जात आहे. हे सर्व लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे. ट्वीटरवर लोक व्यक्त होत असतात. तुम्ही लोकांना व्यक्त होण्यापासून रोखत आहात. हा विद्रोही तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे लोक व्यक्त होणार! असे ही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -