घर क्रीडा Chess World Cup 2023 Final Result: आर प्रज्ञानानंद याचं स्वप्न भंगलं; कार्लसन...

Chess World Cup 2023 Final Result: आर प्रज्ञानानंद याचं स्वप्न भंगलं; कार्लसन ठरला विश्वविजेता

Subscribe

कार्लसन आणि प्रज्ञानानंद यांच्यात झालेल्या कडव्या झुंजीनंतर कार्लसन हा विश्वविजेता ठरला तर प्रज्ञानानंद याला पराभवाचा सामना करावा लागला.

क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या आर प्रज्ञानानंद याचं चेस वर्ल्ड कप जिंकलण्याचं स्वप्न भंगलं आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा चेस वर्ल्ड कपचा विजेता ठरला आहे. टायब्रेकच्या पहिल्या गेममध्ये प्रज्ञानानंद याला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे प्रज्ञानानंद याला कमबॅक करणं अवघड झालं. कार्लसन यानं पुढील गेममध्ये हा सामना ड्रॉ केला आणि सामना आपल्या नावावर केला. आत प्रज्ञानानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात झालेल्या क्लासिकल प्रकारातील दोन्ही सामने हे अनिर्णित राहिले होते. त्यामुळे याचा निकाल हा टायब्रेकरमध्ये पोहोचला. या टायब्रेकरमध्ये मॅग्नस कार्लसन यानं प्रज्ञानानंद याच्यावर मात करत चेस वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. (Chess World Cup 2023 Final Result R Pragnanand s dream shattered Carlson became the world champion)

टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी 25-25 मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टायब्रेकर सामना कार्लसन यानं जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानानंद याला जिंकणं अनिवार्य होतं. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविश्वास वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता झाला.

- Advertisement -

प्रज्ञानानंद यानं पाच वेळच्या विश्वविजेत्या कार्लसन याच्यापुढे आपल्या सर्वोच्च खेळाचं प्रदर्शन केलं. 32 वर्षांच्या कार्लसन यानं 2004मध्ये ग्रँडमास्टर हा खिताब मिळवला तेव्हा प्रज्ञानानंद यांचा जन्मही झाला नव्हता. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना हा रंगतदार झाला, पण अखेर अनुभवाने बाजी मारली. प्रज्ञानानंद फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. 18 वर्षीय खेळाडूचे आभार, त्याचा फायनलपर्यंतचा प्रवास मात्र दमदार होता. प्रज्ञानानंज याने FIDE चं तिकीट मिळालं आहे, असं ट्वीट फिडेने केलं होतं.

( हेही वाचा: UWW Vs WFI: भारतीय महासंघाचं सदस्यत्व रद्द; युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा निर्णय )

- Advertisement -

 

- Advertisment -