घरक्रीडाबिर्याणी खाल, तर बाहेर जाल

बिर्याणी खाल, तर बाहेर जाल

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणि निवड समिती अध्यक्षपदी माजी कर्णधार मिस्बाह उल हक याने पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्डकप २०१९ मध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसबाबत खूप प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे बिर्याणी आणि त्यासारख्या खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचे आदेश नव्या प्रशिक्षकाकडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला देण्यात आले आहेत.

मिस्बाहच्या निवडीनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे पहिले सराव शिबीर भरवण्यात आले. या शिबिरात पाकिस्तानी खेळाडूंच्या आहारात आता बिर्याणी, तेलकट पदार्थ किंवा गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार नाही, असे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे आहार व्यवस्थापन सांभळणार्‍या कंपनीच्या सदस्याने सांगितले.

- Advertisement -

पाकिस्तानी खेळाडू हे जंक फूड आणि तेलकट पदार्थ तसेच मांसाहाराचे खवय्ये आहेत हे सार्‍यांनाच माहिती आहे. ते जेव्हा पाकिस्तानी संघाचे प्रतिनिधित्व करत नसतात, तेव्हा ते अशा पदार्थांवर आडवा हात मारतात. पण आता त्यांच्या आहाराचे एक लॉग बूक ठेवले जाणार असून त्यांच्या आहाराची नोंद ठेवली जाणार आहे. आणि जर कोणी या संदर्भातील नियम मोडला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे, असे मिस्बाहने सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -