घरक्रीडामीरा -भाईंदर शहरातील वादग्रस्त बिल्डर प्रकरण नागपूर विधी मंडळात

मीरा -भाईंदर शहरातील वादग्रस्त बिल्डर प्रकरण नागपूर विधी मंडळात

Subscribe

त्याउलट विकासकाने काशीमिरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हाताशी धरून मयत वास्तुविशारदावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील वादग्रस्त बिल्डर उमराव ओस्तवाल अनधिकृत इमारत प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत विकासकाला मदत करणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ओस्तवाल यांनी बनाव करून पालिकेकडून पार्ट तळ अधिक चार मजल्यांची परवानगी घेऊन सात मजल्याच्या अनधिकृत टोलेजंग इमारती बांधल्या,असे आरोप आहेत. त्यांचे बनावट बांधकाम परवानग्या आणि नकाशे तयार करून त्याद्वारे सर्व सामान्य जनतेला त्या अनधिकृत इमारतींमधील सदनिका आणि दुकाने विक्री करून फसवणूक केलेले असताना पालिकेकडून मागील १५ वर्षांपासून अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केलेली नाही.तसेच साधा एमआरटीपीचा गुन्हाही नोंद केलेला नाही. त्याउलट विकासकाने काशीमिरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हाताशी धरून मयत वास्तुविशारदावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

मीरा- भाईंदर मुख्य रोडवर सिल्व्हर पार्क जवळील आशादीप नावाची ७ मजली इमारत कुलदीपसिंह ओस्तवाल व उमराव ओस्तवाल या विकासकांनी विकसित केलेली आहे. या इमारतीला महापालिकेने २००६-०७ मध्ये पार्ट तळ अधिक पार्ट ४ मजले इतकी परवानगी असताना ती तळ अधिक ७ मजल्यांची बांधली आहे. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यातच २७ ऑक्टोबर रोजी विकासक कुलदीपसिंह ओस्तवाल यांच्या फिर्यादीवरून काशीमीरा पोलिसांनी मयत वास्तू विशारदावर गुन्हा दाखल केला आहे. लीड कन्सल्टंटचे सुब्रम्हण्यम राव यांनी २००७ पासून ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत इमारतीची सुधारित बांधकाम परवानगी आणून दिली नाही. त्यासाठी त्यांनी फी म्हणून ५५ हजार रुपये घेतले व फसवणूक केली, असे ओस्तवाल यांनी नमूद केले होते. या प्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राऊत तपास करत होते. तो गुन्हा त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनीष वानखेडे हे करत आहेत. तर त्यांना सदरील गुन्ह्याचा तपास संदर्भात विचारले असता त्यांनी सदरील गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झाल्याने तो गुन्हा समरी फाईल करणार आहोत असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -