घरक्रीडावर्षाच्या सुरुवातीलाच धक्का; David Warner ची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

वर्षाच्या सुरुवातीलाच धक्का; David Warner ची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा धाक्कड सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डेव्हिड वॉर्नरने विश्वचषक 2023 मध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याच्या कारकिर्दीतील अंतिम सामना खेळला होता.

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा धाक्कड सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. डेव्हिड वॉर्नरने विश्वचषक 2023 मध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याच्या कारकिर्दीतील अंतिम सामना खेळला होता. तसंच, 3 जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध जी कसोटी मालिका खेळली जाणार आहे, ती डेव्हिडची शेवटची कसोटी मालिका असणार आहे. कसोटी मालिकेचा शेवटचा सामना डेव्हिड वॉर्नरचा रेड बॉल क्रिकेटमधील शेवटचा कसोटी सामना असेल. कसोटी मालिकेतील निवृत्ती त्याने आधीच जाहीर केली होती. (Cricket At the beginning of the year David Warner retired from one day cricket)

फॉक्स क्रिकेटच्या म्हणण्यानुसार, डेव्हिड वॉर्नरने जाहीर केले आहे की पाकिस्तानविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानातील त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. सोमवारी सकाळी नवीन वर्षाच्या निमित्ताने अंतिम कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना वॉर्नरने सांगितले की त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा एक चांगला निर्णय घेतला होता. कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या लेफ्ट हँड बॅटर वॉर्नरने सांगितले की, तो एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होईल.

- Advertisement -

वॉर्नरने स्पष्टीकरण दिले की जर ऑस्ट्रेलियाला 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सलामीवीर आवश्यक असेल तर तो यासाठी तयार आहे, परंतु तो म्हणाला की एकदिवसीय क्रिकेटमधून सेवानिवृत्त झाल्यास परदेशात फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची अधिक संधी मिळेल. तथापि, त्याने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीबदद्ल काहीही सांगितले नाही.

वॉर्नरची एकदिवसीय कारकीर्द

डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा एकदिवसीय सामना हा विश्वचषक 2023 चा होता. त्या सामन्यात वॉर्नरने 3 चेंडूंमध्ये 7 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरबद्दल सांगायचं झालं तर, त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 111 सामन्यांच्या 19 डावांत एकूण 6 हजार 932 धावा केल्या. या स्वरूपात त्याची सर्वाधिक धावसंख्या 179 धावा आहे. त्याने सरासरी 45 पेक्षा जास्त धावा केल्या. 22 शतके आणि 33 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. त्याने 733 चौकार आणि 130 षटकारही चोपले आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Year End 2023 : विश्वचषक न जिंकताही भारतीय संघच बाजीगर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -