घरक्रीडाHarbhajan Singh : फिरकीपटू हरभजन सिंहला राज्यसभेत उमेदवारी, पंजाबमध्ये आपचे सरकार येताच...

Harbhajan Singh : फिरकीपटू हरभजन सिंहला राज्यसभेत उमेदवारी, पंजाबमध्ये आपचे सरकार येताच केजरीवालांचा मोठा निर्णय

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला आम आदमी पक्षाने राज्यसभेत उमेदवारी दिली आहे. भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हरभजन सिंहला राज्यसभेत उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु पंजाबमध्ये आपचे सरकार येताच आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरभजनला राज्यसभेत उमेदवारी देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूकीच्या प्रचारादरम्यानच भगवंत मान यांनी जाहीर केले होते की, त्यांच्या कार्यकाळात पंजाबमध्ये खेळांना भरपूर प्रोत्साहन दिले जाईल. त्याप्रमाणे आता हरभजन सिंगला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

या महिन्याच्या अखेरीस आम आदमी पार्टीला राज्यसभेसाठी पाच जागा मिळणार आहेत. यामध्ये हरभजन सिंहचे पहिले नाव समोर आले आहे. या महिन्याच्या अखेरीस आम आदमी पार्टीला राज्यसभेसाठी पाच जागा मिळणार आहेत. यामध्ये हरभजन सिंगचे पहिले नाव समोर आले आहे. आम आदमी पार्टीच्या हायकमांडने हरभजन सिंहच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

- Advertisement -

जेव्हापासून आपने स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची चर्चा केली. तेव्हापासून हरभजनचे नाव आघाडीवर होते. भगवंत मान आणि हरभजन सिंह हे दोघेही जवळचे मित्र समजले जातात. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा अनपेक्षित विजय झाला असतानाही हरभजन सिंहने ट्विट करून भगवंत मान यांचे अभिनंदन केले होते.

हरभजनने ट्विट करून लिहिले होते की, आम आदमी पार्टीचे अभिनंदन, माझे मित्र भगवंत मान मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. आईंसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. अनेक दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात पराभूत केले. ११७ मध्ये या निवडणुकीत AAP ने ९२ जागा जिंकल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Russia-Ukraine War : आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली रशियाविरोधी भूमिका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -