घरताज्या घडामोडीआता अवकाशात सूटकेसद्वारे होणार सामानाची वाहतूक, अमेरिकेच्या स्टार्टअप कंपनीने बनवली विशेष कॅप्सुल

आता अवकाशात सूटकेसद्वारे होणार सामानाची वाहतूक, अमेरिकेच्या स्टार्टअप कंपनीने बनवली विशेष कॅप्सुल

Subscribe

अमेरिकेच्या एका स्टार्ट अप कंपनीने विशेष कॅप्सुल म्हणजेच सूटकेस तयार केली आहे. या सूटकेसद्वारे आंतराळातून जगातील कोणत्याही कोपऱ्यात सामानाची वाहतूक करता येणार आहे. दरम्यान हे तंत्रज्ञान जगात सामानाची वाहतूक करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल घडवण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या इनवर्जन स्पेस नावाच्या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तसेच जगात कोणत्याही ठिकाणी या कॅप्सुलद्वारे सामान पोहचवू शकतो असे या कंपनीने म्हटलं आहे.

‘इनवर्जन स्पेस’ या कंपनीने २०२१ मध्ये एक करोड रुपये आंतराळातून सामानाची वाहतूक करण्यासाठी एक कॅप्सुल तयार करण्यासाठी वापरले आहेत. ही कंपनी लॉस एंजेलिस येथे आहे. व्यावसायिक कामासाठी आणि संरक्षण उद्योगासाठी या यंत्राची निर्मिती कंपनीला करायची आहे. तसेच याचा वापर जागतिक स्तरावर वितरण आणि पुरवठा तसेच स्पेस स्टेशनवर मदत करण्यासाठी फायदेशीर ठरेल. हे कॅप्सुल पुन्हा पुन्हा वापरण्यासारखे असून आंतराळातून वाहतूक करण्यासाठी सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पुरवठा आणि तेथून परतण्यासाठी मदत करेल. शासकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल असा विश्वास कंपनीला आहे. भविष्यात व्यावसायिक कॅप्सुल तयार करण्याबाबतही कंपनीचा विचार आहे.

- Advertisement -

नासासुद्धा अशा नवीन प्रयत्न करत असणाऱ्या कंपन्यांना मदत करत आहे. पुन्हा वापरात येणारे हे कॅप्सुल सूटकेस अवकाश बाजारात मोठे योगदान देऊ शकते. तसेच सध्या कंपनी एका चार फूट अंतर आणि व्यास असलेले कॅप्सुल विकसित करत आहे. या आकारात बसणाऱ्या वस्तूंची वाहतूक करणं शक्य होणार आहे.

पॅराशूटची चाचणी

या कॅप्सुल यंत्राची निर्मिती २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनी सध्या दीड फूटाच्या कॅप्सूलच्या निर्मिती आणि चाचणीवर काम करतक आहे. याच कंपनीने एका रे पॅराशूटची देखील चाचणी घेतली होती. ३० हजार फूटावरुन एका विमानातून वस्तू खाली फेकण्यात आली त्याला पॅराशूट जोडण्यात आला होता. जेव्हा हे कॅप्सूल विकसित होईल आणि अंतराळात प्रवेश करेल तेव्हा पृथ्वीच्या बाह्य वातावरणातील आवाजाला २५ पट वेगाने धडक देल आणि पृथ्वीवर येण्यासाठी पॅराशूटचा वापरकरेल. हे कॅप्सूल अंतराळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर स्वतःच मार्ग शोधेल किंवा त्या कक्षेत फिरत राहील. हे कॅप्सूल सौर ऊर्जेचा वापर करुन काम करेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : DRDO ने हायब्रिड तंत्रज्ञानाने 45 दिवसात विकसित केली इमारत, नव्या विक्रमाची नोंद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -