घरक्रीडाIPL 2020 : सुरेश रैनाचे चेन्नई संघात पुनरागमन? अधिकाऱ्यांनी दिले 'हे' उत्तर 

IPL 2020 : सुरेश रैनाचे चेन्नई संघात पुनरागमन? अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ उत्तर 

Subscribe

रैना हा आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून अचानक माघार घेतली होती. रैना हा आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने यंदा या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेणे हा चेन्नईसाठी मोठा धक्का होता. त्याची कमी आता चेन्नई संघाला जाणवत आहे. चेन्नईने यंदाच्या मोसमाची विजयी सुरुवात करताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी चेन्नईला सलग दोन सामन्यांत पराभूत केले. चेन्नईकडून फॅफ डू प्लेसिस एकाकी झुंज देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रैना चेन्नई संघात पुनरागमन करेल अशी चाहते आशा करत आहे. आता रैनाच्या पुनरागमनाबद्दल चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी भाष्य केले आहे.

आम्ही त्याच्या निर्णयाला मान दिला  

रैना पुनरागमन करेल आणि चेन्नईच्या कामगिरीत सुधारणा होईल असे नाही. आम्ही त्याचा आता विचार करू शकत नाही. त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले होते आणि आम्ही त्याच्या निर्णयाला मान दिला. त्यामुळे आम्ही रैनाच्या पुनरागमनाचा विचार करू शकत नाही, असे विश्वनाथन म्हणाले. चेन्नई संघाला उत्कृष्ट चाहते लाभले आहेत आणि मी त्यांना सांगू इच्छितो की, आमचा संघ दमदार पुनरागमन करत पुढील सामन्यांत चांगला खेळेल. खेळात हार-जीत होतच असते. काही सामने तुम्ही जिंकता, तर काही सामने तुम्ही गमावता. मात्र, जिंकण्यासाठी काय केले पाहिजे हे आमच्या खेळाडूंना माहित असल्याचेही विश्वनाथन म्हणाले.

- Advertisement -

चेन्नई संघ सापडला अडचणीत 

रैना यंदाच्या मोसमात खेळत नसल्याचे चेन्नईला संघ अडचणीत सापडला आहे. रैना हा वर्षानुवर्षे चेन्नई संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दमदार कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. फॅफ डू प्लेसिस यंदाच्या मोसमात तिसऱ्या क्रमांकावर खेळला असून त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याला इतरांची साथ लाभलेली नाही. रैना संघात परतल्यास डू प्लेसिस सलामीवीर म्हणून खेळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -