घरIPL 2020IPL 2020 : मनीष पांडेचे अर्धशतक; केकेआरविरुद्ध हैदराबाद ४ बाद १४२

IPL 2020 : मनीष पांडेचे अर्धशतक; केकेआरविरुद्ध हैदराबाद ४ बाद १४२

Subscribe

पांडेने ३८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. 

मनीष पांडेने केलेल्या अर्धशतकामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १४२ अशी धावसंख्या उभारली. हैदराबादच्या फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करता आली नाही. तसेच अखेरच्या षटकांतही त्यांना फटकेबाजी करण्यात अपयश आले. हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा सामना असून दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे हा सामना जिंकत यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे.

कर्णधार वॉर्नरच्या ३६ धावा  

या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हैदराबादचे सलामीवीर वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाची संयमी सुरुवात केली. बेअरस्टोने मागील सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती, पण या सामन्यात त्याला चांगला खेळ करता आला नाही. त्याला अवघ्या ५ धावांवर पॅट कमिन्सने बाद केले. वॉर्नरने काही काळ खेळपट्टीवर घालवत ३० चेंडूत ३६ धावांची खेळी केल्यावर त्याला वरुण चक्रवर्तीने माघारी पाठवले.

- Advertisement -

पांडे, साहाने डाव सावरला 

मनीष पांडे आणि वृद्धिमान साहा यांनी हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली. पांडेने चांगली फलंदाजी करत ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला ५१ धावांवर आंद्रे रसेलने बाद केले. त्याने या धावा ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केल्या. तर वृद्धिमान साहा ३० धावांवर धावचीत झाला. यानंतरच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे हैदराबादला २० षटकांत ४ विकेट गमावत १४२ धावाच करता आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -