घरक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना रद्द होण्याची भीती!

भारत-ऑस्ट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना रद्द होण्याची भीती!

Subscribe

मेलबर्नला होणारा 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना रद्द करावा लागू शकेल अशी भीती डेविड वॉर्नरला वाटत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आला. हा टी-२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होता आणि त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी व एकदिवसीय मालिका खेळणार होता. टी-२० विश्वचषक यंदा होणे शक्य नसले तरी भारताचा ऑस्ट्रेलियाला दौरा ठरल्याप्रमाणेच पार पडणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, मेलबर्न येथे होणारा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागू शकेल अशी भीती ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला वाटत आहे.

आताच काहीही सांगणे शक्य नाही

व्हिक्टोरियामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आताच काहीही सांगणे शक्य नाही. तुम्ही आज एक योजना आखली, तर ती तुम्हाला उद्या बदलावी लागू शकते. ‘बॉक्सिंग डे’ कसोटी होणारच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. अंतिम निर्णय घेण्याआधी काही काळ वाट पाहावी लागेल. परंतु, ‘बॉक्सिंग डे’ कसोटी पहिल्यांदाच मेलबर्नमध्ये न होता, इतर ठिकाणी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वॉर्नर म्हणाला.

- Advertisement -

२६ डिसेंबरपासून ‘बॉक्सिंग डे’ कसोटी

मेलबर्न हे ऑस्ट्रेलियातील दुसरे सर्वात मोठे शहर असून तिथे २६ डिसेंबरपासून ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला सुरुवात होते. हा सामना पाहण्यासाठी एक लाख प्रेक्षक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये येतात, तसेच टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी असते. परंतु, यंदा कोरोनामुळे बॉक्सिंग डे कसोटी रद्द होण्याची किंवा इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -