घरक्रीडाIndia Vs South Africa : वनडे टीमच्या निवडीमध्ये विलंब, रोहित अनफिट असल्यास...

India Vs South Africa : वनडे टीमच्या निवडीमध्ये विलंब, रोहित अनफिट असल्यास कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार?

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या दौऱ्यासाठी वनडे टीमच्या निवडीमध्ये विलंब होणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियनमध्ये सुरू असलेली पहिली मालिका खेळून झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. व्हाईट बॉल फॉरमॅटचे कर्णधार रोहित शर्माबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हिटमॅन रोहित शर्मा सध्या रिकव्हरी मोडच्या मार्गावर आहे. तसेच नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये तो सतत काम करत आहे. जर वनडे मालिकेपर्यंत तो पूर्णपणे फिट झाला नाही. तर पुढील कर्णधारपदाची धुरा वेगवान फलंदाज के.एल. राहुलकडे दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार?

जेव्हा रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर गेला. तेव्हा के.एल. राहुलला त्याच्या जागेवर उपकर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास देण्यात आली होती. व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही पहिली वनडे मालिका असेल. परंतु रोहितचं फिट असणं हे खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

मालिकेत आतापर्यंत तीन आठवड्यांचा कालावधी

वनडे मालिका सुरू होण्यासाठी आतापर्यंत तीन आठवड्यांचा कालावधी आहे. निवडक रोहित शर्माला संघात सामील करून घेऊ शकतात. कारण रोहितला रिकव्हर होण्यासाठी १९ जानेवारीपर्यंतचा कालावधी असण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रोहित शर्मा जाण्याआधीच त्याला मुंबईमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला कसोटी मालिकेतून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे पूर्णपणे फिट होण्यासाठी रोहित शर्मा एनसीएमध्ये तयारी करत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कधी होणार वनडे मालिका?

पहिला सामना – १९ जानेवारी

दुसरा सामना – २१ जानेवारी

तिसरा सामना – २३ जानेवारी


हेही वाचा : Maharashtra Assembly: प्राण्यांचा आवाज काढणं म्हणजे मतदारांच्या विश्वासाला तडा ; अजित पवारांनी टोचले आमदारांचे कान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -