घरक्रीडाहरभजन सिंगचा क्रिकेट जगताला अलविदा, राजकीय इनिंग सुरू करण्याची शक्यता

हरभजन सिंगचा क्रिकेट जगताला अलविदा, राजकीय इनिंग सुरू करण्याची शक्यता

Subscribe

ट्विटरवर निवृत्तीची घोषणा करताना हरभजन सिंग म्हणाला, "सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला आणि आज मी त्या खेळाला निरोप देतो, ज्याने मला आयुष्यात सर्व काही दिले, मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी हा माझा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला, खूप खूप धन्यवाद."

नवी दिल्ली : भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. 41 वर्षीय हरभजन सिंगने भारताकडून 711 विकेट घेतल्यात. टर्बनेटर म्हणून प्रसिद्ध असलेला हरभजन राजकारणाच्या मैदानावर आपली नवी इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे. अलीकडेच त्याचा पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी हरभजन काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो, असे वृत्त आहे.

ट्विटरवर निवृत्तीची घोषणा करताना हरभजन सिंग म्हणाला, “सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला आणि आज मी त्या खेळाला निरोप देतो, ज्याने मला आयुष्यात सर्व काही दिले, मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी हा माझा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला, खूप खूप धन्यवाद.”

- Advertisement -

हरभजन आयपीएलच्या नवीन फ्रँचायझीमध्ये सामील होण्याची शक्यता

आयपीएल (IPL 2022) च्या पुढील हंगामात हरभजन एका मोठ्या फ्रँचायझीमध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून सामील होऊ शकतो, असे वृत्त आहे. टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या या स्टार स्पिनरला पंजाब पोलिसांनी 10 वर्षांपूर्वी डीएसपीपदाची ऑफर दिली होती. त्याने ती कधीच स्वीकारलेली नाही.

हरभजन सिंगची क्रिकेट कारकीर्द

हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्याने भारतासाठी 103 कसोटी सामन्यात 417 विकेट घेतल्या. भज्जीनेही दोन शतकांसह 2235 धावा केल्या. 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट आहेत. T20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 28 सामन्यात 25 विकेट घेतल्यात. अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि रविचंद्रन अश्विन (427) यांच्यानंतर हरभजन सिंगने भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेतलेत. या आयपीएल गोलंदाजाच्या नावावर 150 विकेट आहेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -