घरक्रीडाIND vs ENG : माझी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी!

IND vs ENG : माझी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी!

Subscribe

चौथ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमारने ५७ धावांची मॅचविनिंग खेळी केली.

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. त्याने या सामन्यात अवघ्या ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची मॅचविनिंग खेळी केली. सूर्यकुमारने या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला फलंदाजी मिळाली नाही. असे असतानाही त्याला तिसऱ्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले. परंतु, त्याचे चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आणि त्याने अप्रतिम फलंदाजी केली. सूर्यकुमारला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, पुढील सामन्यांत कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची त्याची तयारी आहे.

वरच्या क्रमांकावर संधी मिळाल्याचा आनंद

मागील तीन-चार वर्षांत मी सर्व क्रमांकांवर फलंदाजी केली आहे. मी सलामीलाही खेळलो आहे आणि सातव्या-आठव्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. त्यामुळे संघाच्या हितासाठी माझी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी असते. मी संघ व्यवस्थापनालाही हेच सांगितले आहे. माझी संघासाठी काहीही करण्याची तयारी आहे. मात्र, चौथ्या टी-२० सामन्यात मला वरच्या (तिसऱ्या) क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. संघ व्यवस्थापनाने मला सामन्याच्या सकाळीच याबाबतची माहिती दिली. त्यामुळे मला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. पुढील सामन्यांतही कोणत्याही क्रमांकावर खेळून चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सूर्यकुमार म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -