घरक्राइमपोलिसाच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी BJP MLA सुनील कांबळेंच्या विरोधात गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

पोलिसाच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी BJP MLA सुनील कांबळेंच्या विरोधात गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

Subscribe

ससून रुग्णालयातील तृतीयपंथी करिता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे शुक्रवारी (5 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पुणे : भाजपाच्या आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस काँस्टेबलला कानशिलात लगावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील तृतीयपंथी करिता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे शुक्रवारी (5 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी सुनील कांबळेंनी पोलीस काँस्टेबलच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना सुनील कांबळेंनी पोलीस काँस्टेबल शिवाजी सरक हे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कानशिलात लगावली होती. काँस्टेबलच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका होऊ लागली होती. यानंतर शुक्रवारी रात्री पोलीस काँस्टेबलला कानशिलात लगावल्याप्रकरणी सुधीर कांबळेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात 70 नाट्यगृहे बांधण्याच्या घोषणेने आनंद, पण…; प्रशांत दामलेंनी व्यक्त केली अपेक्षा

काय आहे प्रकरण ?

ससून रुग्णालयातील तृतीयपंथी करिता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे शुक्रवारी (5 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पण या कार्यक्रम पत्रिकेत सुधीर कांबळेंचे नाव छापले नसल्याने ते नाराज होते. सुनील कांबळेंनी कार्यक्रमाआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना मारहाण केली. यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर सुनील कांबळेंनी पोलीस काँस्टेबल शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावली होती.

- Advertisement -

हेही वाचा – INDIA : …तर पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार, तृणमूल काँग्रेसची भूमिका

कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल पाळला गेला नाही

पोलीस काँस्टेबलच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी सुनील कांबळे म्हणाले, “मला माहीत नाही, तो कोण होता? मी मंचावरून खाली उतरत असताना माझ्या शर्टाला धरून खेचल्यामुळे मला धक्का दिला. या सरकारी कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल पाळला गेला नाही. कोण मंचावर आले, कोणाचा काही पत्ता नव्हता. कार्यक्रमात आमदारांना धक्काबुक्की होते, हे योग्य नाही. आमदारांना जाणूनबुजून धक्काबुकी केली.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -