घरक्रीडाIND vs ENG : 'हा' दिग्गज म्हणतो...भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी!

IND vs ENG : ‘हा’ दिग्गज म्हणतो…भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी!

Subscribe

भारताची वेगवान गोलंदाजांची फळी जगातील सर्वोत्तमपैकी एक आहे.

भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल वातावरण आणि खेळपट्ट्या असतात. याचा फायदा घेण्याची भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये क्षमता असल्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांना वाटते. भारताकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असून त्यांना इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचे मत चॅपल यांनी व्यक्त केले.

चांगले वेगवान गोलंदाज असणे फायदेशीर

मागील काही वर्षांत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताची वेगवान गोलंदाजांची फळी जगातील सर्वोत्तमपैकी एक आहे. याच कारणाने, त्यांना ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात यश आले. त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. चांगले वेगवान गोलंदाज संघात असल्याचे नक्कीच काही फायदे असतात, असे चॅपल म्हणाले.

- Advertisement -

वेगवान गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका 

भारताने मागील काही वर्षांत परदेशात उत्तम कामगिरी केली आहे. भारताला ऑस्ट्रेलियात दोनदा, तर वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले. तसेच भारतीय संघाने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले. भारताच्या या यशात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांसारख्या वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -