घरलाईफस्टाईलरोगप्रतिकारशक्ती वाढवणारी 'गुळवेल' ठरतेयं यकृतासाठी धोकादायक, डॉक्टरांचा इशारा

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ‘गुळवेल’ ठरतेयं यकृतासाठी धोकादायक, डॉक्टरांचा इशारा

Subscribe

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या अनेक औषधी वनस्पती आणि पारंपारिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र या औषधांचा शरीरावर गंभीर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान मुंबईत औषधी वनस्पतींच्या अधिक सेवनामुळे यकृतावर गंभीर परिणाम झाल्याची जवळपास सहा प्रकरणे समोर आली होती. यापैकी बहुतेक रूग्णांमध्ये कावीळ आणि थकवा अशी लक्षणे आढळून आली. डॉक्टरांनी या रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाची तपासणी केली असता असे दिसून आले की, हे सर्व रुग्ण टीनोस्पोरा कॉर्डिफोलियाचे सेवन करीत होत. ज्याला सामान्य भाषेत गिलॉय अर्थात गुळवेल असे म्हणतात. वैद्यकीय उपचारांमध्ये गुळवेल ही उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे.

‘इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ द लिव्हर’ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार यकृत तज्ज्ञ डॉ. आभा नागराळ यांनी सांगितले की, एका ६२ वर्षाच्या वृद्ध महिलेला पोटासंबंधीत अधिक त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे चार महिने ती या पोटासंबंधीत आजाराशी झुंज देत होती, मात्र ४ महिन्यांनी तिची या आजाराशी झुंज संपली. यावर डॉ. नागराळ यांनी सांगितले की, बायोप्सीद्वारे यकृतमधील जीवघेण्या आजाराविषयी माहिती मिळते. परंतु कोरोना संकटावेळी अनेक आरोग्य तज्ञांनी बर्‍याच वेळा गुळवेल रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करत असे सांगितले.

- Advertisement -

या अभ्यासाशी काहीच संबंध नसलेले यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. एएस सोईन यांनी सांगितले की, गुलवेळच्या अतिसेवनामुळे आत्तापर्यंत यकृत खराब होण्याची पाच प्रकरणे समोर आली होती. तर यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.  कोरोना साथीच्या काळात बरेच लोक रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ऑक्सिडंट म्हणून गिलॉयचा वापरत करत होते. यामुळे अनेकांना यकृतासंबंधीत आजारांचा सामना करावा लागला. मात्र अनेकांनी गिलॉयचा वापर थांबवल्यानंतर रुग्ण काही महिन्यांनी बरे झाले. गिलॉय हे त्या वैकल्पिक औषधांपैकी एक आहेत ज्याची शिफारस आयुष मंत्रालयानेच शिफारस केली होती. आयुष मंत्रालयाने असा दावा केला होता की, गिलॉय सार्स-सीओव्ही -2 द्वारे झालेल्या कोरोना विषाणुविरोधात रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

गुळवेलीची पाने सुपारीच्या पानांइतकी असतात. त्या पानांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फोरस पर्याप्त प्रमाणात आढळते. या व्यतिरिक्त, त्याच्या देठांमध्ये स्टार्चचे सर्वाधिक प्रमाण असते. या गुळवेलीचे बरेच फायदे आयुर्वेदातही सांगितले जातात. आयुर्वेदानुसार, गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरंच अनेक धोकादायक आजारांपासून संरक्षण करते.

- Advertisement -

अगदी विज्ञानाच्या जगातील गुळवेलीच्या पानांना एक उत्तम आयुर्वेदिक औषध मानले जाते. चयापचय प्रणाली, ताप, खोकला, सर्दी आणि लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्यांव्यतिरिक्त आपल्याला बर्‍याच मोठ्या आजारांपासून वाचवू शकते. अनेक जण गुळवेलीचा वापर उकडलेले पाणी, रस, चहा किंवा कॉफीच्या स्वरूपात याचा वापर करतात. गुळवेलीची पानं कावीळच्या रुग्णांसाठीही फायदेशीर मानली जातात. काही लोक ती पावडरच्या रूपात घेतात, तर काहीजण त्याची पाने पाण्यात उकळवून पितात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -