घरताज्या घडामोडीमोहन भागवत यांचे विधान म्हणजे 'मुंह मे राम, बगल में छुरी'... मायावतींचा...

मोहन भागवत यांचे विधान म्हणजे ‘मुंह मे राम, बगल में छुरी’… मायावतींचा आरएसएस व भाजपवर निशाणा

Subscribe

सोमवारी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी भागवत यांचे विधान म्हणजे मुंह मे राम, बगल मे छुरी असल्याचे म्हणत आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला.

सर्व हिंदुस्थानींचा डिएनए एकच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी नुकतेच केले. त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. सोमवारी बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी भागवत यांचे विधान म्हणजे ‘मुंह मे राम, बगल मे छुरी ‘असल्याचे म्हणत आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला.

तसेच ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे ती राज्य आरएसएसच्या अजेंड्यावरच चालत असल्याचही त्या म्हणाल्या. भागवत यांनी केलेलं विधान कोणालाही पटण्यासारखं नाही. आरएसएस आणि भाजप यांच्या बोलण्यात व वर्तनात बरचं अंतर आहे. तसेच देशातलं राजकारण विभाजनकारी असल्याचं भागवत यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात भाजप सरकारमुळेच जातियवाद, राजकीय व्देष आणि धार्मिक हिंसाचारामुळे सामान्य जनता त्रासली असल्यांचा आरोपच मायावती यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की उत्तर प्रदेशात आज गोंधळाचं वातावरण आहे. बसपाने नेहमीच आरएसएसच्या धोरणांचा विरोध केला आहे. आरएसएसशिवाय भाजपच अस्तित्वच नाहीये. ते जे बोलतात प्रत्यक्षात नेहमी त्याच्या उलट वागतात. त्याचबरोबर मायावती यांनी धर्मांतरणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या जी लोक जबरदस्तीने धर्मांतरण करतात त्यांच्यावर कारवाई केलीच पाहीजे. पण त्याला हिंदू-मुस्लीम मुद्दा बनवता कामा नये. प्रत्येकवेळी मु्स्लीम समाजाकडे संशयाने बघणे योग्य नाहीये.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी देशात राहणाऱ्या सर्व हिंदुस्थानींचा डिएनए एकच असल्याचे विधान केलं होतं. तसेच कोणीही वेगळं नसून ज्या लोकांना मुस्लीम या देशात नको आहेत. ते खरे हिंदू नाहीत असेही भागवत यांनी म्हटले होते. दरम्यान,उत्तर प्रदेशात निवडणुका होणार असल्याने भागवतांच्या या विधानावरून राजकारण सुरू झाले आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -