घरक्रीडाविराट कोहलीला आऊट कसे करावे हाच मोठा प्रश्न, इग्लंडला विराटची भीती

विराट कोहलीला आऊट कसे करावे हाच मोठा प्रश्न, इग्लंडला विराटची भीती

Subscribe

विराट चांगला खेळाडू आणि जागतिक दर्जाचा फलंदाज

इग्लंड क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. कर्णधार विराट कोहलीला आगामी सामन्यांत कसे पराभूत करायचे हे आम्हाला अजून ठाऊक नाही असे मोईन अलीने म्हटले आहे. इंग्लंड संघाला वाटत आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये संघाच्या विजयात विराट सामील नव्हता त्यामुळे या कसोटीत चांगली खेळू करु शकतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मुलीच्या जन्मामुळे ऑस्ट्रेलियातील कसोटीत फक्त सुरुवातीचे सामना खेळून मायदेशात परतला होता. ५ फेब्रुवारीपासून इग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधाराची धुरा सांभाळणार आहेत.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, आगामी कसोटीत विराटला कसे पराभूत करायचे माहित नाही. विराट चांगला खेळाडू आणि जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. तसेच तो चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमी प्रेरित असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील विजयानंतर आता विराट अनेक प्रेरणेने कामगिरी करेल. कारण तो ऑस्ट्रेलियातील विजया नव्हता. आपल्या मुलीच्या जन्मामुळे विराट कोहली भारतात परतला होता.

- Advertisement -

विराट कोहलीला आऊट कसे करावे हा प्रश्न पडला असल्याचे मोईन अलीने म्हटले आहे. कारण विराट कोहलीची कोणतीही कमजोरी नाही असे मला वाटत आहे. इंग्लंडची गोलंदाजी उत्तम असून आमच्याकडे वेगवान गोलंदाज आहेत. असे मोईन अलीने म्हटेल आहे. विराट माझा चांगला मित्र आहे. परंतु आम्ही क्रिकेटविषयी बोलत नाही असेही मोईन अलीने म्हटले आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर मोईन अलीने इग्लंडच्या संघात आगमन केले आहे. मोईन म्हणाला की तो आताही संघाला विजय मिळवून देऊ शकतो. भारतासोबतच्या कसोटीसाठी तयार असल्याचेही त्याने सांगितले. कसोटी सामन्यावितिरिक्त इग्लंडला भारतात तीन वनडे आणि ५ टी२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळायचे आहेत.

- Advertisement -

तसेच मोईन पुढे म्हणाला की, मला अजूनही वाटते की मी विकेट घेऊ शकतो. अधिक धावा काढू शकतो आणि सामना जिंकू शकतो. माझी काही छोटी उद्दिष्ट्ये आहेत. जी मला पहिली पुर्ण करायची आहेत. तसेच मी २०० विकेट घेण्यास फार दूर नाही. मला संघात घेतले जाणार आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. परंतु खेळण्याच्या बाबतीत मी पुर्ण तयार आहे. मी खुप काळ खेळण्यासाठी वाट बघितली असल्याचे मोईनने म्हटले आहे. मोईन अली श्रीलंका दौऱ्यावर असताना कोरोना संक्रमित सापडला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -