घरताज्या घडामोडी'फडणवीस सरकारने त्रास दिला तर महाविकास आघाडीने न्याय दिला'

‘फडणवीस सरकारने त्रास दिला तर महाविकास आघाडीने न्याय दिला’

Subscribe

मागील सरकारने मला खूप त्रास दिला. मात्र, महाविकास आघाडी सरकारने मला न्याय दिल्याची प्रतिक्रिया, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

‘फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला. तर महाविकास आघाडी सरकारने मला न्याय दिला’, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात ते बोलत त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने तात्याराव लहाने यांना सामजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी दिलेल्या भाषणात त्यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. त्यांच्या या आरोपामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा रंगली.

काय म्हणाले तात्याराव?

अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने तात्याराव लहाने यांना सामजभूषण पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी भाषण केले. त्या भाषणात म्हणाले की, ‘फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आणि त्यांनी मला न्याय मिळवून दिला. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली. तसेच मुंडे यांना चांगल्या कामांसाठी आपला पाठिंबा आहे’, असे देखील ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

डोळ्यांची काळजी घेण्याची गरज

या कार्यक्रमात तात्याराव लहाने यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्याचा विशेष सल्ला दिला. तसेच त्यांनी सांगितले की काही गोष्टी आपण प्रमाणाच्या बाहेर खातो. उदारणार्थ. गाजर, पपई, शेवग्याची शेंग. परंतु, याचे प्रमाणात सेवन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

जातीवरुन गावाचे नाव नसावे

‘अनेक गाव खेड्यात अजूनही जातीवरुन गावाची नावे आहेत. मात्र, जातीवरुन गावाचे नाव नसावे. कारण ते आपल्याला शोभण्यासारखे नाही. तसेच ते आपल्याला परवडणारेही नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन आपल्या गावांची नावे बदलावी आणि संत, महामानवांच्या किंवा महापुरुषांच्या नावाने गावाची नावे ठेवावी’, असे मत धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात मांडले.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार खूप अनुभवी, पण कृषी कायद्यांबाबत त्यांची दिशाभूल – कृषीमंत्री तोमर


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -