घरक्रीडाविराटच्या नावे आणखी एक 'विक्रम'

विराटच्या नावे आणखी एक ‘विक्रम’

Subscribe

विराटने कसोटी सामन्यात ६००० धावा पूर्ण करत सचिनचा रेकॉर्ड मोडला असून जलद गतीने हे साध्य करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.

भारताचा कर्णधार विराटने ११९ कसोटी सामन्यांत ६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडत दुसरा सर्वात जलद गतीने ६००० धावा पूर्ण करणारा भारतीय ठरला आहे. लिटील मास्टर सुनील गावस्करांनी ११७ डावात ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. तर सचिनला कसोटी सामन्यात ६००० धावा पूर्ण करण्यासाठी १२० डाव खेळावे लागले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत विराटला ६००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती. त्या पूर्ण करत विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडला आहे.

विराटने कसोटीतील ६००० धावांचा टप्पा गाठत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला असल्याने त्याच्यावर सर्वच स्थरातून शुभेच्छा वर्षाव होत असून बीसीसीआयने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून  विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

चौथ्या कसोटीत भारताचे वर्चस्व

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीतील पराभवानंतर भारताने तिसरी मॅच जिंकल्याने मालिकेत आपले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर सध्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या बॉलर्सने अप्रतिम कामगिरी करत इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावात रोखला असून आता भारत बॅटिंग करत आहे. सध्या लन्च ब्रेक वेळी भारताची १०० वर दोन बाद अशी परिस्थिती असून विराट आणि पुजारा बॅटिंग करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -