घरमुंबईमुंबईत आहे देशातलं पहिलं महिला गोविंदा पथक!

मुंबईत आहे देशातलं पहिलं महिला गोविंदा पथक!

Subscribe

मुंबईमध्ये १९९६ साली महिलांचे एक गोविंदा पथक मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दहीहंडी फोडत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या गोविंदा पथकाचे नाव आहे गोरखनाथ महिला दहिडंडी पथक! १९९६ साली मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेल्या पहिल्या वहिल्या महिला गोविंदा पथकाने फक्त मुंबईतच नाही तर आता राज्याच्या बाहेरदेखील जाऊन नावलौकिक मिळवला.

‘गो…गो…गो…गोविंदा’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात उंच उंच दहीहंडीचे थर. आणि त्या उंचच उंच थरांवर चढून हंडी फोडणारा गोविंदा. एकेकाळी गोविंदा पथके म्हटली की पुरुषांची मक्तेदारी असयाची. मात्र आता पुरुषांप्रमाणेच महिला गोविंदा पथके देखील उंचच उंच थर लावतात. पण तुम्हाला माहीत आहे का भारतात पहिल्यांदा कधी महिला गोविंदा पथक तयार झाले? मुंबईमध्ये १९९६ साली महिलांचे एक गोविंदा पथक मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दहीहंडी फोडत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या गोविंदा पथकाचे नाव आहे गोरखनाथ महिला दहिडंडी पथक! १९९६ साली मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेल्या पहिल्या वहिल्या महिला गोविंदा पथकाने फक्त मुंबईतच नाही तर आता राज्याच्या बाहेरदेखील जाऊन एक नावलौकिक मिळवला.

आजवर या ठिकाणी फोडल्या दहीहंडी

गेल्या १० वर्षांपासून हे गोविंदा पथक मुंबईच्या बाहेर जाऊन दहीहंडी फोडत आत्तापर्यंत द्वारका, उडपी, उजनी, इंदूर, नाशिक, अमृतसर, मथुरा, कर्नाटक, वाराणसी, कोल्हापूर, पुणे दगडूशेठ हलवाई, गुजरात या ठिकाणी जाऊन हंडी फोडल्या आहेत. यंदा हे पथक शिर्डीमध्ये जाऊन हंडी फोडणार आहे.

- Advertisement -

पथकातील मुलींना बाहेर जाण्याची संधी

या गोविंदा पथकामध्ये बहुतेक मुली आणि महिला गोविंदा या नोकरी करणाऱ्या तसेच सर्वसामान्य घरातील आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. तसेच यातील काहींना ते परवडतही नाही. त्यामुळे या निमित्ताने या पथकातील मुलींना बाहेरचं जग पाहाता येतं आणि आपली दहीहंडी इतर राज्यात पोहोचते, अशी प्रतिक्रिया या मुलींचे प्रशिक्षक चंदू कांबळे यांनी दिली.


तुम्ही हे वाचलंत का? – देशात पहिल्यांदाच ठाण्यात रंगणार ‘प्रो दहीहंडी’चा थरार!

- Advertisement -

शी झाली पहिल्या महिला गोविंदा पथकाची स्थापना

सुरुवातीला गोविंदा म्हटलं की पुरुषांची पथकं असंच समजलं जायचं. आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता आहे. मग महिलांनी देखील दहीहंडी का फोडू नये? असा विचार मनात आला आणि १९९६ साली महिलांचे दहीहंडी पथक तयार केल्याची माहिती या गोविंदा पथकातील महिलांनी दिली. तसेच सध्या जीवघेणी स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून आम्ही मुंबईच्या बाहेरच जाऊन दहीहंडी फोडतो आणि तेही पाच थर लावत असे देखील या महिलांनी सांगितले.

आज स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. आम्ही १९९६ साली पहिल्यांदा आमचे गोरखनाथ महिला दहीहंडी पथक स्थापन केले. यंदा आमचे हे २३वे वर्ष आहे. आम्ही १९९६ पासून अनेक वर्ष मुंबईतील हंड्या फोडल्या. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली थरांची स्पर्धा पाहाता आम्ही मागील १० वर्षांपासून मुंबईच्या बाहेर दहीहंडी फोडणे पसंत करतो.

शलाका कोरगावकर, अध्यक्षा, गोरखनाथ महिला दहिहंडी पथक

मी या गोविंदा पथकात गेली १२ वर्षे आहे. मात्र आम्ही कोणतीही स्पर्धा न करता फक्त ५ थर लावतो. आमचे भारतातील सगळ्यात पहिले महिला दहीहंडी पथक आहोत. जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा बाहेरच्या राज्यात आमच्याकडे कुतुहलाने पाहिले जाते.

हर्षाली पाटील, महिला गोविंदा


तुम्ही हे वाचलंत का? – दहीहंडी उत्सवावर समाजकंटकांच्या दहशतीचे सावट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -