घरक्रीडाIndian team jersey : 'तीन का ड्रीम'; विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची जर्सी...

Indian team jersey : ‘तीन का ड्रीम’; विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची जर्सी आली समोर

Subscribe

Indian team jersey : भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आज (20 सप्टेंबर) भारतीय जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. Adidasकडे भारतीय संघाचे टायटल स्पॉन्सर असून त्यांनी आज जर्सीचे अनावरण केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून जर्सीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (Indian team jersey Three Why Dream The jersey of the Indian team for the World Cup came out)

भारतात होणार्‍या 2023 विश्वचषकासाठी Adidas ने जर्सीमध्ये सुधार केला आहे. नव्या सुधारीत जर्सीमध्ये खांद्यावर तीन पांढर्‍या पट्ट्यांच्या जागी तिरंगा आहे. जे चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज ठरू शकते. याशिवाय बीसीसीआयच्या लोगोमध्ये आता अभिमानाने दोन तारे आहेत, जे 1983 आणि 2011 मध्ये भारताच्या ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संसदेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस; विविध विधेयक मांडली जाणार; ‘या’ मुद्यांवरून गदारोळ होण्याची शक्यता

तीन का ड्रीम

Adidas ने आपल्या विश्वचषक मोहिमेला ‘3 का ड्रीम’ असे नाव दिले आहे आणि भारतीय संघाला देशाच्या अतूट समर्थनाचा पुरावा म्हणून त्याचे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे Adidas चे स्पेशल विश्वचषक गाणे भारतीय रॅपर रफ्तारने गायले आहे. मोहिमेच्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्यासह भारतीय क्रिकेट चाहते दिसत आहेत. भारताने 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसयी विश्वचषक जिंकला होता आणि आता तिसऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघ मैदानावर उतरणार आहे.

- Advertisement -

भारताचा विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध

5 ऑक्टोबर 2023 पासून भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार असून भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यात दोन्ही अव्वल संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. . त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडतील. या स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली गेली आणि आज जर्सीचे अनावरण करण्यात आले. परंतु त्याआधी दोन्ही संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून यजमान भारत पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

हेही वाचा – NTA Exam Calendar 2024: NEET, JEE, CUET परीक्षांच्या तारखा जाहीर

भारताचा विश्वचषक स्पर्धेसाठी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – 14 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका – 2 नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 5 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – 12 नोव्हेंबर, बंगळुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -