घरक्राइमनको त्या ठिकाणी लपवून केली जात होती सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर दोघे...

नको त्या ठिकाणी लपवून केली जात होती सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर दोघे अटेकत

Subscribe

झटपट पैसे कमावण्याच्या नांदात कोण काय करेल सांगता येत नाही. त्यातच कर्नाटकातील दोघांनी सोने तस्करीचा नवा फंडा शोधून काढला. मात्र, नागपूर विमानतळ सीमाशुल्क विभागाने या दोघांना अटक करत त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले हे विशेष.

नागपूर : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने, ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना कस्टम डिपार्टमेंट अटक केल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये उघडकीस आल्या आहेत. आता मुंबईनंतर उपराजधानीमध्येही सोने तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे. कारण, आज सकाळी दोघांना नागपूर विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अडीच किलो सोन्यासह पकडले. त्याची किंमत सुमारे 87 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. (Gold was smuggled in hidden places Both were arrested at Nagpur airport)

झटपट पैसे कमावण्याच्या नांदात कोण काय करेल सांगता येत नाही. त्यातच कर्नाटकातील दोघांनी सोने तस्करीचा नवा फंडा शोधून काढला. मात्र, नागपूर विमानतळ सीमाशुल्क विभागाने या दोघांना अटक करत त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले हे विशेष.

- Advertisement -

दोन्ही तस्कर कर्नाटकातील

कर्नाटक राज्यातील आरोपी मो. शाहिद नालबंद (33) हा हुबळी रहिवासी असून पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर (38) हा हंगल कर्नाटकचा रहिवासी आहे. या दोघांनी सोने नको त्या ठिकाणी लपवून पेस्ट स्वरूपात आणले होते. मात्र सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…

- Advertisement -

सीमाशुल्क विभागाला मिळाली होती आधीच माहिती

कतार एअरवेजमधून दोन जण सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळावर सापळा रचला. फ्लाइट लँड होताच कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना थांबवले आणि एका खोलीत नेऊन त्यांची झडती घेतली. दोघांकडून अडीच किलो सोने सापडले. हे सोने पेस्टच्या स्वरूपात होते, जे प्रायव्हेट पार्टमध्ये लपवण्यासाठी कॅप्सूलचे स्वरूप देण्यात आले होते. दोघेही पहिल्यांदाच नागपूर विमानतळावर उतरले होते. दोघेही कर्नाटकातील असून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : कॅनडानं भारताला पुन्हा डिवचलं; हत्येच्या आरोपानंतर आता म्हणे, जम्मू काश्मिरमध्ये…

सीडीआरमधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

कस्टम विभाग या दोघांची चौकशी करत आहे. दोघांकडून मोबाइल, पासपोर्ट आणि सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही मोबाइलचे सीडीआर काढले जात आहेत. सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. तर चौकशीदरम्यान दोघांनी अद्याप सूत्रधाराचे नाव उघड केलेले नाही. कस्टमने या प्रकरणाचा तपास एसआयबीकडे सोपवला आहे. कस्टमचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

नागपुरातही वाढली सोन्याची तस्करी

गेल्या काही वर्षांत नागपुरात सोन्याची तस्करी वाढली आहे. सोन्याच्या तस्करीची प्रकरणे ज्या प्रकारे उघडकीस येत आहेत, ते पाहता नागपूर हे तस्करांसाठी योग्य ठिकाण ठरल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -