घरIPL 2020IPL 2020 : आईने मोल मजुरी करून बनवलं क्रिकेटर; आता गाजवतोय IPL

IPL 2020 : आईने मोल मजुरी करून बनवलं क्रिकेटर; आता गाजवतोय IPL

Subscribe

IPL मधून दरवर्षी नवे प्रतिभावान खेळाडू जगाला मिळतात. ऋषभ पंत, इशान किशन, संजू सॅमसन, राहुल तेवातिया असे अनेक प्रतिभावान खेळाडू भारताला मिळाले आहेत. यामध्ये नव्या खेळाडूचा समावेश होऊ शकतो. हा खेळाडू आहे टी नटराजन. टी नटराजन हा सनरायझर्स हैदराबादमधून यंदाचा मोसम खेळतोय. टी नटराजनने त्याच्या गोलंदाजीवर संघाला आयपीएलच्या १३ व्या मोसमातला पहिला विजय मिळवून दिला.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात नटराजनने यॉर्करचा अचूक मारा केला. डेथ ओव्हर्समध्ये नटराजनने दिल्लीच्या ऋषभ पंतला आणि हेटमायरला शात ठेवलं. नटराजनच्या अचूक माऱ्यापुढे दिल्लीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. डेथ ओव्हर्समध्ये नटराजनच्या अचूक माऱ्यामुळे हैदराबादला दिल्लीवर विजय मिळवता आला. मात्र, या नटराजनच्या यशामागे त्याची मेहनत, त्याच्या आईची मेहनत आहे. नटराजन हा गरीब कुटुंबातून पुढे आला आहे.

- Advertisement -

नटराजनचा जन्म तामीळनाडूच्या चिन्नापाम्पटी गावात गरीब कुटुंबात झाला. नटराजनची आई मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. हलाखीच्या परिस्थितीतही नटराजन खचून गेला नाही. नटराजन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धआ खेळायचा. तेव्हाच प्रशिक्षक जयप्रकाश यांनी नटराजनमधला गोलंदाज हेरला. त्यानंतर त्याला तामीळनाडू प्रिमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. नटराजनच्या आयुष्यात आईसोबतच प्रशिक्षक जयप्रकाश यांचं देखील महत्तवाचं स्थान आहे. नटराजन त्याच्या आयपीएल टीमच्या जर्सीवर प्रशिक्षक जेपी यांचं नाव लिहितो. नटराजनला ३ भाऊ-बहिण आहेत. आपल्या भावंडांना चांगलं शिक्षण द्यायची नटराजनची इच्छा आहे. नटराजनने आयपीएलमधून मिळालेल्या पैशांमधून घर घेतलं, पण अजून त्याने गाडी विकत घेतलेली नाही. महत्त्वाची कामं पहिली करायची आहेत, गाडीनंतर घेता येईल, असं नटराजन म्हणतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -