घरदेश-विदेशआजपासून वाहतुकीचे नियम बदलले; वाहन चालकांना मिळणार दिलासा

आजपासून वाहतुकीचे नियम बदलले; वाहन चालकांना मिळणार दिलासा

Subscribe

देशात १ ऑक्टोबरपासून बरेच मोठे बदल होणार आहेत. विशेषत: गुरुवारपासून, आपण वाहतूक पोलिसांनी थांबवलं तर डिजिटल कागदपत्रे दाखवून पुढे जाऊ शकता. आता वाहन, चालक परवान्यासह सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवणे बंधनकारक नसणार आहे. रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम १९८९ मध्ये दुरुस्ती करत डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या दिशेने काम करीत आहेत. ज्याअंतर्गत आता मंत्रालय १ ऑक्टोबर २०२० पासून बदललेले नियम लागू करणार आहे. त्यामुळे आजपासून आपणास आपली कार, बाईक किंवा इतर कोणत्याही वाहनासह आवश्यक कागदपत्रे नेण्याची आवश्यकता नसणार आहे.

ड्रायव्हर्स आता त्यांच्या वाहनाशी संबंधित कागदपत्रे Digi-locker किंवा m-parivahan यामध्ये ठेवू शकतात आणि आवश्यक असल्यास ते डिजिटल पद्धतीने दर्शविण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजेच आता वाहतूक पोलीस हार्ड कॉपीची मागणी करणार नाहीत. वाहनाशी संबंधित कोणत्याही कागदपत्रांसाठी डिजिटल प्रमाणीकरण पूर्ण झाल्यास त्यांना कोणतीही कागदपत्रे दर्शविण्याची आवश्यकता नाही. याशिवाय वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना सरकारच्या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून ई-चालानही देण्यात येणार आहे. एवढंच नव्हे तर वाहन चालविण्याचा परवाना रद्द केल्यानंतर डिजिटल पोर्टलवर अहवाल द्यावा लागणार आहे. कोणत्याही वाहनाची तपासणी वारंवार केली जाऊ नये, यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी होईल, अशी सरकारची इच्छा आहे.

- Advertisement -

मंत्रालयाचे म्हणणं आहे की नव्या नियमांनुसार वाहतुकीचे उल्लंघन केल्यास ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवण्यात येणार आहे. ज्यामध्ये अधिकारी आणि ड्रायव्हरचे वर्तन देखील रेकॉर्डवर ठेवले जाईल. ज्यामध्ये तपासाची वेळ, पोलिस अधिकाऱ्यांचा गणवेश व ओळखपत्रांची नोंद पोर्टलवरही अद्ययावत केली जाईल. अधिकृत अधिकारी नवीन वाहतूक नियमांच्या कक्षेतही येतील.

याशिवाय १ ऑक्टोबरपासून एक विशेष नियम बदलत आहे. वाहन चालवताना मोबाईल फोन वापरण्याच्या नियमातही मंत्रालयाने सुधारणा केली आहे. मोबाईल किंवा इतर हँडहेल्ड उपकरणे केवळ ड्राईव्हिंग दरम्यान मार्ग दाखवण्यासाठी वापरली जातील. तसंच, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की ही उपकरणं वापरताना संपूर्ण लक्ष ड्रायव्हिंगवर केंद्रित असायला हवं. याशिवाय फोनवर बालताना आढलं तर दंड भरावा लागू शकतो. वाहन चालवताना फोनवर बोलताना पकडल्यास एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो, असंही स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

आता परवाना, आरसीसुद्धा घरूनच ऑनलाइन पद्धतीने करता येईल. नव्या अधिसूचनेनुसार आता आधार कार्डचा वापर ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी, परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी, वाहन नोंदणी करण्यासाठी व त्याशी संबंधित कागदपत्रांमध्ये पत्ता बदलण्यासाठी करता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -