इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमाबाबत सध्या बरीच चर्चा आहे. या स्पर्धेत चेतेश्वर पुजारा कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पुजारा त्याच्या सावध आणि तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच त्याला आयपीएलमध्ये याआधी आपली छाप पाडता आलेली नाही. पुजाराने कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघाकडून खेळताना आतापर्यंत आयपीएलमध्ये ३० सामन्यांत ३९० धावा केल्या आहेत. तसेच त्याने या धावा केवळ ९९.७४ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्याला २०१४ नंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. यंदा मात्र तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडून खेळणार असून खेळाडू लिलावात त्याला सीएसकेने ५० लाख रुपयांत खरेदी केले. पुजारा यंदा वेगळ्या स्टाईलमध्ये खेळताना दिसू शकेल.
याचे कारण म्हणजे तो सीएसकेच्या नेट्समध्ये चांगलीच फटकेबाजी करताना दिसला. त्याने दीपक चहर आणि करण शर्मा यांसारख्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी केली. त्याच्या या फटकेबाजीवर चाहते फिदा झाले असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. तसेच त्याने त्याच्या स्टान्समध्येही थोडा बदल केल्याचे दिसले. त्यामुळे आता पुजारा यंदाच्या मोसमात कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
40 ball hundred loading
— CRICFAN #DCian (@flickofkohli_18) March 30, 2021
After seen sixes in the net practice of Pujara
All CSK fan be like#CSK #IPL2021 #pujara #Dhoni #Cricket #csk pic.twitter.com/9hdelH1Q6E— Mahesh Tank (@maheshtak29) April 1, 2021
Le Pujara to everyone! 😎 pic.twitter.com/RdjkLKpbIE
— Kuch bhi (@kuchbhiJ3) April 1, 2021
Wow, @cheteshwar1 changed his stance, more uplift of a bat, may be that’s the way to go for hard hitting in shorter formats, can’t wait to see him, hope @msdhoni_7781 gives him the chance to prove his worth
— vlskumar (@vlskumar2) March 30, 2021