घरमनोरंजन'ती फायटर आहे', किरण यांच्या आजारावर पती अनुपम खेर यांची पहिली प्रतिक्रिया

‘ती फायटर आहे’, किरण यांच्या आजारावर पती अनुपम खेर यांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार किरण खेर (Kirron kher) यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांना धक्काच बसला. यानंतर बॉलिवूडमधूनही ही आजाराची बातमी वाऱ्यासारखी पसरु लागली. बॉलिवूड कलाकारांसह अनेक चाहते आता किरण खेर लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. याचदरम्यान आता किरण खेर यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी किरण यांच्या प्रकृतीबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर यांनी लांबसडक ट्विट करत पत्नीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

या पोस्टच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘अफवा पसरु नये, म्हणून शेअर करतो’ असे लिहिले आहे. तर अनुपम यांनी पुढे लिहिले की, सिकंदर आणि मी सांगू इच्छितो की, किरणला मल्टीपल मायलोमा या ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, आम्हाला विश्वास आहे की, ती या आजारीशी मात करत खंबीर होऊन बाहेर पडेल. आम्ही नशीबवान आहोत की, एक उत्तम डॉक्टरांची टीम सध्या किरणवर उपचार करतेय. ती एक फायटर आणि या संकटावरही ती मात करेल. ती प्रत्येक गोष्ट मनापासून करते. तिच्यात दडलेल्या प्रेमामुळे लोकही तिला खूप प्रेम देतात. सध्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने तिची प्रकृती स्थिर आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठींब्यासाठी आभार.

सध्या किरण खेर यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती सर्वप्रथम चंदीगडचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी दिली होती. किरण खेर या चंदीगडमध्ये भाजपच्या खासदार आहेत. दरम्यान ३१ मार्च रोजी चंदीगडमधील काँग्रेस नेत्यांनी खासदार किरण खेर यांच्या मतदार संघातील अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. याच प्रश्नावर उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी किरण खेर यांच्या ब्लड कॅन्सर आजाराची माहिती दिली.

- Advertisement -

बुधवारी 31 मार्चला घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत बोलताना अरुण सूद म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात किरण खेर चंदीगडमध्ये होत्या. नोव्हेंबरमध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांवर चंदीगडमध्येच उपचार सुरु होते. मात्र यावेळी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये किरण खेर यांना मल्टिरल माइलोजा आजार असल्याचे समजले. यानंतर खेर पुढील उपचारांसाठी ४ डिसेंबर रोजी मुंबई रवाना झाल्या. या आजारावरील उपचारांसाठी त्यांना मुंबईत दर आठवड्याचा एक दिवस रुग्णालयात भर्ती करावे लागते. तसेच चेकअपसाठीही त्यांनी रुग्णालयात सतत ये-जा करावी लागत आहे. याच कारणामुळे पुढील काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही सूद यांनी दिली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -