घरक्रीडाIPL 2021 : रोहित शर्मा आता वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार! 'हे' आहे...

IPL 2021 : रोहित शर्मा आता वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार! ‘हे’ आहे कारण 

Subscribe

यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आगामी मोसमाबद्दल सध्या बरीच चर्चा होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार असून गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. आयपीएलच्या सलामीच्या लढतीत रोहित शर्माच्या मुंबईसमोर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान असणार आहे. यंदाच्या मोसमात कर्णधार रोहित आणि मुंबईचा संघ मागील वर्षीपेक्षा वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबईने शनिवारी आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले. यंदा या जर्सीच्या हातांच्या कडा आणि कॉलरच्या खालच्या बाजूला नारंगी रंगाचा वापर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

‘प्रत्येक वर्षी नवी जर्सी तयार करताना आम्ही खूप विचार करतो. आमचे खेळाडू आणि चाहते ही जर्सी खूप अभिमानाने परिधान करतात हे आम्हाला ठाऊक आहे. ज्या गोष्टींनी मुंबई इंडियन्सला भारतातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी बनवले आहे, त्या गोष्टी या जर्सीच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे या नव्या जर्सीबाबत मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले.

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मुंबईने मागील मोसमाच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर मात करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यंदा मुंबईचे जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्याचे लक्ष्य असेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -