घरमुंबईकोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन नाही तर 3 T हाच प्रभावी उपाय - फडणवीस

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन नाही तर 3 T हाच प्रभावी उपाय – फडणवीस

Subscribe

'चाचण्या वाढवण्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या लाटेची वाट पाहावी लागली'

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा जास्त असल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी कोरोनाच्या दुसर्या लाटेची वाट पाहावी लागली, तसेच कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन नाही तर ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट हाच प्रभावी उपाय असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सचिन वाझे आणि मनसूख हिरेन प्रकरणावरुन खडाजंगी सुरु होती. परंतु कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने दिवसाला १ लाख लोकांची चाचणी करणार असल्याचा निर्णय घेतल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केली आहे.

राज्यात अधिकाधिक ९० हजारापर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस अधिकाधिक ९० हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस ! तसेच चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या महाविकास आघाडी शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

- Advertisement -

मागील १० दिवसांत सरासरी १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो आता तरी हे सूत्र कायम ठेवा, येणाऱ्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थीती भयावह झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूरात कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, नागपूरमधील स्थिती फार भयावह झाली आहे. कालच्या दिवसात ४५०० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये लोकांना आता बेडस मिळत नाही आहेत. नागपूरमधील रुग्णालयात जागा नाही आहे त्यामुळे नागपूरमध्ये गंभीर परिस्थीत आहे. प्रशासनाला पुर्ण अॅक्टिव मोडमध्ये न्यावे लागेल. आणि लोकांना आता मदत करावी लागणार असल्याचेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -