घरक्रीडाIPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे दोन खेळाडू संघाबाहेर

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे दोन खेळाडू संघाबाहेर

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाची उद्यापासून (22 मार्च) सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मात्र पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघाला मोठा धक्क बसला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वाची उद्यापासून (22 मार्च) सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मात्र पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघाला मोठा धक्क बसला आहे. चेन्नईच्या संघातील डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मथीशा पाथिराना याला हॅमस्ट्रिंगची दुखापती झाली आहे. या दुखापतीमुळे मथीशा पाथिराना आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. (IPL 2024 Matheesha Pathirana to miss start match due to hamstring injury)

एका स्पोर्टच्या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मथीशा पाथिराना याला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे मथीशा पाथिरानाला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात खेळता आले नाही. सध्या पाथिराना हा श्रीलंका क्रिकेट यांच्या फिजिओच्या निगराणीखाली आहे. तसेच, श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून जोपर्यंत सांगितले जात नाही, तोपर्यंत पाथिराना चेन्नईच्या संघात सामित होता येणार नाही. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सामन्याला मथीशा पाथिराना मुकणार आहे.

- Advertisement -

चेन्नईसाठी मथीशा पाथिराना संघात नसणे धक्कादायक आहे. कारण आधीच दुखापतीमुळे न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे तो मे महिन्यापर्यंत मैदानात परतणार नाही आहे. त्यामुळे संघातील दोन महत्त्वाचे खेळाडूंच्या अनुपस्थितीत चेन्नईला सामने खेळावे लागणार आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघात मधल्या फळीत फलंदाजी करणारा शिवम दुबे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून बरा होऊन चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

पाथिरानाच्या अनुपस्थितीमुळे बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुस्तफिझूरला क्रॅम्पचा त्रास झाला होता आणि 18 मार्च रोजी चट्टोग्राम येथे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होते. पण आता मुस्तफिझूरची तब्येत ठीक असून तो चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024 : ‘फॅमिली डिनर’वेळी सुनील शेट्टींचे जावयाकडे दुर्लक्ष, तर रोहित शर्माला म्हटले मुलगा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -