घरक्रीडाIPL Auction : पाणीपुरी विकणारा किक्रेटपटू बनला करोडपती

IPL Auction : पाणीपुरी विकणारा किक्रेटपटू बनला करोडपती

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२० च्या मोसमासाठी गुरुवारी (आज) कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु होता. या लिलावात एक रोमांचक घटना घडली. या लिलावात भारताच्या अंडर १९ संघाचा अवघ्या १७ वर्षांचा खेळाडू यशस्वी जयस्वाल हा २.४ कोटी रुपयात विकला गेला. विशेष म्हणजे अंडर १९ खेळाडूंमध्ये यशस्वी हा सर्वात युवा खेळाडू आहे. त्यामुळे देशभरात यशस्वी जयस्वालची चर्चा सुरु झाली आहे.

यशस्वी जयस्वालला राजस्थान रॉयल्स या संघाने २.४० कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. विशेष म्हणजे यशस्वीची बेस प्राईज २० लाख रुपये इतकी होती. यावर किंग्स इलेव्हन पंजाबने ८० लाख रुपयांची बोली लावली. त्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्सने (केकेआर) १.९० कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर राजस्थान रॉयलने २ कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर केकेआरने पुन्हा भाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस राजस्थान रॉयलने २.४ कोटी रुपयांत विकत घेतले.

- Advertisement -

यशस्वी जयस्वाल याचा प्रवास तसा खडतरच. लहानपणापासून क्रिकेटर होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याचा जन्म उत्तर प्रदेशच्या भदोही या गावात झाला. २०१२ साली तो आपल्या वडिलांसोबत मुंबईत आला. त्यावेळी त्याचे वय फक्त ११ वर्षे होते. मुंबईतील वरळी येथे त्यांच्या काकांचे छोटेसे घर आहे. तिथे त्याची राहण्याची सोय होणार नव्हती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला एका डेअरीमध्ये त्याच्या रात्रीच्या राहण्याची सोय केली.

मात्र, यशस्वी हा दिवसभर आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. काही दिवसांनी मुलगा काही कामाचा नाही म्हणून यशस्वीला नवीन जागा शोधायला सांगितली. त्यानंतर यशस्वी आझाद मैदानात गेला. तिथे मुस्लिम युनाइटेड क्लबच्या ग्राउंडमनसोबत त्याची राहण्याची व्यवस्था झाली. तिथे तो तीन वर्ष राहिला. सुरुवातीला त्याला वडील पैसे पाठवायचे. मात्र, त्यानंतर यशस्वीने स्वत:चा उदरनिर्वाह स्वत:च करायचे ठरवले. दिवसा तो फूड वेंडरजवळ काम करायचा आणि रात्री पाणीपुरी विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -