घरक्रीडाईशांत शर्माची उणीव भासेल, पण भारताकडे इतरही चांगले गोलंदाज - रहाणे

ईशांत शर्माची उणीव भासेल, पण भारताकडे इतरही चांगले गोलंदाज – रहाणे

Subscribe

ईशांतला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती.

भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. भारतीय संघाने मागील काही वर्षांत परदेशात चांगली कामगिरी केली असून भारताच्या या यशात ईशांतने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईशांतची उणीव भासेल, असे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला वाटते.

आमची गोलंदाजांची फळी मजबूत आहे. मात्र, तरीही आम्हाला ईशांतची उणीव नक्कीच भासेल. त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे. परंतु, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यासह उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज असे अप्रतिम गोलंदाज आमच्या संघात आहे. हे सर्व गोलंदाज अनुभवी आहेत आणि त्यांना ऑस्ट्रेलियात कशी गोलंदाजी करायची हे ठाऊक आहे. ही नवी मालिका असून पहिली कसोटी गुलाबी चेंडूने होणार आहे. सामना जिंकण्यास आवश्यक २० विकेट घेण्यासाठी आमचे गोलंदाज सक्षम आहेत, असे रहाणेने सांगितले.

- Advertisement -

तसेच पहिल्या कसोटीत ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन खेळू शकेल असे संकेत रहाणेने दिले. अश्विनची भूमिका महत्वाची असणार आहे. तो खूप अनुभवी गोलंदाज असून त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. त्यामुळे आमच्यासाठी त्याची गोलंदाजी आणि फलंदाजीही खूप महत्वाची असणार आहे, असे रहाणे म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -