घरक्रीडाफिफाच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत मेस्सी नाही

फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत मेस्सी नाही

Subscribe

बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी याला फिफाने जाहीर केलेल्या मागील वर्षाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या यादीत स्थान मिळालेले नाही. १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच मेस्सीला या यादीतून वगळण्यात आले आहे.

फिफाने नुकतेच जाहीर केलेल्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराच्या यादीत ज्युव्हेंटस आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डो, लिव्हरपूल आणि इजिप्तचा खेळाडू मोहम्मद सलाह आणि रियाल मॅड्रिड आणि क्रोएशियाचा खेळाडू लुका मॉड्रीच या तिघांची निवड झाली आहे. मात्र, या यादीत लिओनेल मेस्सीचा समावेश नाही. २००६ पासून प्रत्येक वर्षी मेस्सीला या यादीत स्थान मिळालेले होते. त्यामुळे १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच त्याला या यादीतून वगळण्यात आले आहे.

 

- Advertisement -

रोनाल्डोने पाचवेळा हा पुरस्कार जिंकला आहे 

मागील दोन वर्षे हा पुरस्कार जिंकणाऱ्या पोर्तुगालच्या क्रिस्तिआनो रोनाल्डोने यावर्षीही रियाल मॅड्रिडला चॅम्पिअन्स लीग स्पर्धा जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. रियाल मॅड्रिडने चॅम्पिअन्स लीग ही स्पर्धा सलग तीन वर्षे जिंकत नवा विक्रम केला होता. त्यांच्या या विजयात रोनाल्डोने प्रमुख भूमिका बजावली होती. पण यावर्षीच जुलैमध्ये त्याला ज्युव्हेंटस या संघाने करारबद्ध केले आहे. रोनाल्डोने रियाल मॅड्रिडकडून खेळताना मागील फुटबॉल मोसमात ४४ सामन्यांत ४४ गोल केले होते.
सौजन्य – Goal.com

मॉड्रीच आणि सलाह यांना पहिल्यांदाच मानांकन

लिव्हरपूल या इंग्लिश संघाकडून खेळताना मोहम्मद सलाहने मागील फुटबॉल मोसमात अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याने मागील मोसमात ५२ सामन्यांत ४४ गोल केले होते. त्यामुळे लिव्हरपूलने चॅम्पिअन्स लीगच्या अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली होती. त्यामुळे त्याला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तर क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीचने या फिफा वर्ल्डकपमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. त्याला या स्पर्धेच्या सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला होता. त्याच्या रियाल मॅड्रिड आणि क्रोएशिया या दोन्ही संघानी मागील फुटबॉल मोसमात चांगले प्रदर्शन केले होते.

मेस्सीला मात्र निराशा 

बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीने मागील मोसमात रोनाल्डो आणि सलाहप्रमाणेच ४४ गोल केले होते. पण या फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेन्टिनाकडून खेळताना त्याला चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. याचा फटका त्याला बसला आहे.
फिफा पुरस्कार विजेत्यांची घोषणा 24 सप्टेंबरला लंडन येथे केली जाणार आहे.

 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -