घरक्रीडाviral video : PSL चे वाद थांबेना ! विकेट घेतली अन् लगावली...

viral video : PSL चे वाद थांबेना ! विकेट घेतली अन् लगावली कानशिलात

Subscribe

पाकिस्तान सुपर लीग मैदानाबाहेरील वाद आणि काही चांगल्या सामन्यांमुळे सध्या चर्चेत आहे. अॅलेक्स हेल्स आणि पॉल स्टार्लिंग या खेळाडूंनी वैयक्तिक कारणामुळे पीएसएलमधून माघार घेतली आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जैम्स फॉकनरने पैशांअभावी लीग अर्धवट सोडली आहे. फॉकनरने हॉटेलच्या मालमत्तेचेही नुकसान केले आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. मात्र, मैदानावरील एक वादग्रस्त आणि सामने चर्चेचा विषय ठरतो.

सामन्यादरम्यान नक्की काय झालं?

लाहोर कलंदर्सचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने सामन्यादरम्यान त्याचा सहकारी कामरान गुलामला कानशिलात लगावली. रऊफला मागील महिन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जची जर्सी भेट दिली होती. गुलामने पेशावर जाल्मीच्या हजरतुल्ला जजईची कॅच सोडली होती. मात्र, त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फवाद अहमदने कॅच घेतल्यामुळे मोहम्मद हरीसला माघारी पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

- Advertisement -

सिलिब्रेट करताना लगावली कानशिलात

रऊफने विकेट घेतल्यानंतर गुलाम रऊफकडे हाय फाईव्हसाठी गेला. परंतु हाय फाईव्ह झाल्यानंतर रऊफकडे त्याच्या कानशिलात लगावली. तरीदेखील कामरान गुलाम हसताना दिसला. मात्र, रऊफ त्याच्याकडे टकमक पहातच राहीला. त्यानंतर गुलामने पेशावरचा कर्णधार वहाब रियाझला १७ व्या ओव्हरमध्ये धावबाद दिला. परंतु रऊफने केलेल्या कृत्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

२०१६ साली पीएसएलमध्ये रियाझने अहमद शहजादला धक्काबुक्की केली होती. त्यानंतर विकेट गेल्यानंतर त्याने बॅट दाखवत रियाझला इशारा दिला होता. परंतु या कृत्यानंतर दोघांनाही ३० ते ४० टक्क्यांचा दंड भरावा लागला होता. दरम्यान, पेशावर टीमने लाहोर टीमला १५९ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु लाहोरला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. पेशावर टीम सुपर ओव्हर्समध्ये जिंकले.


हेही वाचा : Palindrome and Ambigram : आजची तारीख आहे खास ! कारण …


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -