घरक्रीडाIPL 2021 : पियुष चावला 'या' संघांतून खेळताना दिसणार? 

IPL 2021 : पियुष चावला ‘या’ संघांतून खेळताना दिसणार? 

Subscribe

आयपीएलचा खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १४ व्या मोसमाबद्दल सध्या बरीच चर्चा होत आहे. आयपीएलचा खेळाडू लिलाव (Auction) १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणार आहे. या लिलावात स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह भारताच्या काही खेळाडूंना कोणता संघ खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या भारतीय खेळाडूंमध्ये अनुभवी लेगस्पिनर पियुष चावलाचाही समावेश आहे. चावला मागील मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला होता. युएईमध्ये झालेल्या या मोसमात त्याला सात सामन्यांत केवळ सहा विकेट घेता आल्या. तसेच त्याने ९.०९ च्या इकोनॉमीने (एका षटकामागे धावा) धावा दिल्या. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नईच्या संघाने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चावलाने आतापर्यंत १६४ आयपीएल सामन्यांत १५६ विकेट घेतल्या आहेत. हा त्याचा अनुभव पाहता काही संघ त्याला खेळाडू लिलावात खरेदी करण्यास नक्कीच उत्सुक असतील.

मुंबई इंडियन्स – मुंबई इंडियन्सने मागील मोसमात आयपीएलचे जेतेपद पटकावले. आयपीएल जिंकण्याची मुंबईची ही पाचवी वेळ होती. त्यामुळे मुंबई संघात मोठे बदल करणे टाळेल. मुंबईकडे राहुल चहर आणि अनुकूल रॉय या युवकांसह कृणाल पांड्या आणि जयंत यादव हे फिरकीपटू आहेत. परंतु, हरभजन सिंग संघाबाहेर गेल्यापासून मुंबई आणखी एका अनुभवी फिरकीपटूच्या शोधात आहे. त्यामुळे ते चावलावर बोली लावू शकतील.

- Advertisement -

किंग्स इलेव्हन पंजाब – आयपीएल खेळाडू लिलावाआधी किंग्स इलेव्हन पंजाब संघात नऊ जागा रिक्त आहेत. तसेच त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी सर्वाधिक ५३.२ कोटी रुपये आहेत. सध्या पंजाबकडे मुरुगन अश्विन आणि युवा रवी बिष्णोई असे फिरकीपटूंचे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे पंजाब चावलाला आपल्या संघात घेण्याचा विचार करू शकेल. चावला याआधीही पंजाबकडून खेळला आहे.


हेही वाचा – धोनीसह ‘या’ तीन खेळाडूंनी केली आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई!

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -