घरक्रीडाIPL 2021 : धोनीसह 'या' तीन खेळाडूंनी केली आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई!

IPL 2021 : धोनीसह ‘या’ तीन खेळाडूंनी केली आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई!

Subscribe

भारतासह सर्व देशांचे खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० क्रिकेट लीग मानली जाते. या स्पर्धेतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि खेळाडूंनाही खूप मोठा आर्थिक फायदा झाला आहे. ‘आयपीएल स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयचे एका वर्षात तब्बल ४ हजार कोटींचे नुकसान होऊ शकेल,’ असे मागील वर्षी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता. आयपीएल स्पर्धेतून खेळाडूंना दोन महिन्यांहूनही कमी काळात करोडो रुपये मिळतात. त्यामुळे भारतासह सर्व देशांचे खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. या स्पर्धेने अनेक खेळाडूंना मालामाल केले असून या स्पर्धेतून सर्वाधिक कमाई केलेले अव्वल तिन्ही खेळाडू भारताचे आहेत.

१. महेंद्रसिंग धोनी – आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली. अगदी पहिल्या मोसमपासून एका संघाने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. तो संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. चेन्नईने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. चेन्नईच्या यशात कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा खूप महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे चेन्नईने धोनीला अनेकदा रिटेन केले असून त्याला याचा आर्थिक फायदा झाला आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

- Advertisement -

२. रोहित शर्मा – आयपीएल स्पर्धेतून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा दुसरा क्रमांक लागतो. रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडू असून त्याने सहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याआधी तो सुरुवातीला डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला होता. या दोन संघांकडून खेळताना त्याने आयपीएल स्पर्धेतून १४६.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

३. विराट कोहली – भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्याने आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर (५८७८ धावा) आहे. मात्र, कर्णधार म्हणून फारसा यशस्वी ठरलेला नाही. त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स संघाने अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र, असे असतानाही त्याने बंगळुरूकडून खेळताना १४३.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्ली कॅपिटल्स ‘या’ तीन खेळाडूंना संघात घेण्याची शक्यता 


 

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -