घरक्रीडानाशिकच्या खेळाडूंची चमक

नाशिकच्या खेळाडूंची चमक

Subscribe

राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस

बडोदा येथे झालेल्या युटीटी शालेय राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी महाराष्ट्राकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. त्यांनी या स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण सात पदकांची कमाई केली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक मिळवले. या संघात नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि सायली वाणीचा समावेश होता.

तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सायली वाणीने नाशिकच्याच तनिषा कोटेचावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, या फेरीत तिला महाराष्ट्राच्याच पृथा वर्तिकरने पराभूत केले. त्यामुळे सायलीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तनिषा कोटेचाला कांस्यपदक मिळाले. तनिषाची याआधीच खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कुशल चोपडाने १४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रौप्यपदक पटकावले, तर त्याचा समावेश असलेल्या १४ वर्षांखालील महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कांस्यपदक मिळवले. तसेच नाशिकच्या सौमित देशपांडेचा समावेश असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळाले.

- Advertisement -

या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहता, प्रकाश तुळपुळे, यतीन टिपणीस, संजय कडू, प्रकाश जसानी मिलिंद कचोळे, अभिषेक छाजेड,जय मोडक, संजय वसंत, नितीन मोडक, राकेश पाटील, महेश कीत्तूर, अनिल वाघ, मोनाली गोर्‍हे, सुहास आगरकर, रविंद्र मेटकर, प्रवीण व्यवहारे आदींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -