घरक्रीडाश्री समर्थ, विद्यार्थी क्रीडा केंद्र अंतिम फेरीत

श्री समर्थ, विद्यार्थी क्रीडा केंद्र अंतिम फेरीत

Subscribe

चिंतामणी चषक खो-खो

श्री समर्थ व्यायाममंदिर, विद्यार्थी क्रीडा केंद्र या संघांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक खो-खो स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष गटाच्या अंतिम फेरीत सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा ओम समर्थ भारत व्यायाममंदिराशी, तर महिलांच्या अंतिम फेरीत अमर हिंद मंडळाचा सामना शिवनेरी सेवा मंडळाशी होईल.

लालबाग येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या गटातील उपांत्य फेरीत दादरच्या श्री समर्थ व्यायाममंदिर संघाने ओम समर्थचा ११-८ असा एक डाव आणि ३ गुणांनी पराभव केला. श्री समर्थच्या विजयात जतीन गावकर (१:४०, २:४० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), हितेश आग्रे (३:१० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), वरद फाटक (तीन बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओम समर्थच्या प्रथम कदमने चांगली झुंज दिली, पण त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. दुसर्‍या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने सरस्वतीवर ९-८ अशी मात केली. विद्यार्थीच्या या विजयात सम्यक जाधव (२:१०, २:०० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), जितेश नेवाळकर (१:२०, २:०० मिनिटे संरक्षण आणि एक बळी) हे खेळाडू चमकले.

- Advertisement -

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ओम समर्थने अमर हिंद मंडळाचा १२-११ असा एका गुणाने पराभव केला. या सामन्यात ओम समर्थच्या शुभम शिगवणने (२:१०, १:३० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी) चांगला खेळ केला. सरस्वती स्पोर्ट्स क्लबने श्री समर्थ व्यायाममंदिरावर १९-१८ अशी जादा डावात एक गुण आणि २:४० मिनिटे राखून मात करत अंतिम फेरी गाठली.

शिवनेरीची सरस्वतीवर मात

चिंतामणी चषक खो-खो स्पर्धेच्या महिलांमध्ये दादरच्या अमर हिंद मंडळाने श्री समर्थ व्यायाममंदिराचा ५-४ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केले. त्यांच्या या विजयात संजना कुडवने (नाबाद २:४०, ४:४० मिनिटे संरक्षण आणि दोन बळी) महत्त्वाची भूमिका बजावली. दुसर्‍या सामन्यात दर्शना सकपाळच्या दमदार खेळामुळे शिवनेरी सेवा मंडळाने सरस्वती कन्या संघावर जादा डावात १४-१२ अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -