घरक्रीडाभारतीय फिरकीपटूंवर दबाव टाकणे गरजेचे!

भारतीय फिरकीपटूंवर दबाव टाकणे गरजेचे!

Subscribe

भारतीय फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजी करून त्यांच्यावर दबाव टाकणे गरजेचे आहे, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने व्यक्त केले. भारताविरुद्ध हॅमिल्टनला झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने ३४९ धावांचे अवघड लक्ष्य ११ चेंडू राखून पूर्ण केले. या सामन्यात कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा या भारताच्या फिरकीपटूंनी मिळून २० षटकांत १४८ धावा खर्ची केल्या. न्यूझीलंडला दुसरा सामना जिंकण्यासाठी फलंदाजांनी या कामगिरीची पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे, असे गप्टिलला वाटते.

हॅमिल्टन आणि ऑकलंडमधील वातावरण वेगळे आहे. इथे फिरकीपटूंना फारशी मदत मिळणार नाही असा विचार करुन आमच्या फलंदाजांनी त्यांच्याविरुद्ध अधिक आक्रमकपणे फलंदाजी करून त्यांच्यावर दबाव टाकणे गरजेचे आहे. हॅमिल्टनमध्ये आमच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंविरुद्ध अप्रतिम खेळ केला. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील दोन सामन्यांतही आम्ही अशीच कामगिरी करणे गरजेचे आहे, असे गप्टिल म्हणाला. तसेच त्याने पुढे सांगितले, भारताच्या संघात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत. दुसर्‍या सामन्यात ते नक्कीच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आम्हाला हा सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

- Advertisement -

कायेल जेमिसन करणार पदार्पण!
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसनला भारताविरुद्ध दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळणार आहे. ६ फूट ८ इंच उंचीचा जेमिसन लेगस्पिनर ईश सोधीची जागा घेणार आहे. जेमिसनने नुकत्याच झालेल्या भारत अ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंड अ संघाकडून तीन सामन्यांत ६ मोहरे टिपले होते. त्यामुळेच त्याची न्यूझीलंडच्या प्रमुख संघात निवड झाली. त्याने आतापर्यंत २७ स्थानिक एकदिवसीय सामन्यांत ३५ गडी बाद केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -