घरक्रीडानिमा करंडक स्पर्धा

निमा करंडक स्पर्धा

Subscribe

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) क्रीडा महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या डॉक्टरांच्या संघांत क्रिकेटच्या लढती झाल्या. अंतिम सामना पाथर्डी आणि पीएमए या संघांमध्ये झाला. अत्यंत रोमांचक ठरलेला हा सामना बरोबरीत राहिल्याने अखेर ‘सुपर ओव्हर’ खेळविण्यात आली, यात पीएमए संघाने बाजी मारली.

महोत्सवाचे उद्घाटन पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी निमाचे राष्ट्रीय शाखेचे सहखजिनदार शैलेश निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या ताणतणावाकडे पाहता डॉक्टरांच्या शरीर स्वाथ्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे यावेळी निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.

- Advertisement -

हा महोत्सवसाठी समन्वयक डॉ. सुजित सुराणा, डॉ. दीपक पाटील, डॉ. वैभव गरुड, डॉ. संगीत लोंढे, नाशिक निमाचे सचिव डॉ. वैभव दातरंगे, खजिनदार डॉ. प्रतिभा वाघ, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. राहुल चौधरी, डॉ. ललित जाधव, डॉ. वेंकटेश पाटील, डॉ.मनीष हिरे यांनी मोलाची मदत केली आहे. तसेच निमा महिला फोरमच्या अध्यक्षा प्रणिता गुजराथी, दीप्ती बडे यांचेही सहकार्य लाभत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -