घरक्रीडाजीबी बॉक्सिंग स्पर्धा

जीबी बॉक्सिंग स्पर्धा

Subscribe

भारताच्या तीन वेळा आशियाई विजेत्या शिवा थापाने फिनलंड येथे होत असलेल्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्यासह ६ भारतीय बॉक्सर्सनी वेगवेगळ्या वजनी गटात या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत आपले पदक निश्चित केले आहे.

या स्पर्धेत ६० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत शिवा थापाने पोलंडच्या डॉमिनिक पालाकचा ५-० असा पराभव केला. आता त्याचा उपांत्य फेरीत रशियाच्या मिखाईल वारलामोवशी सामना होईल. ५२ किलो वजनी गटात माजी युवा विश्व विजेत्या सचिन सिवाचने रशियाच्या तामिर गालानोवला ४-१ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत २० वर्षीय सिवाचचा किर्गिझस्तानच्या अझत उसेनालीवशी सामना होईल.

- Advertisement -

या दोघांप्रमाणेच राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीनने ५६ किलो वजनी गटात रशियाच्या ओविक ओगानिसियनला, कविंदर सिंह बिश्तने ५६ किलो वजनी गटात अलमानबेत ऐबेकोवला, दिनेश डागरने ६९ किलो वजनी गटात अयादिन बेहरूजला आणि नवीन कुमारने ९१ किलोवरील वजनी गटात अँटी लेहमूसवीरपीला पराभूत करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याआधी सुमित सांगवान (९१ किलो) आणि गोविंद साहनी (४९ किलो) यांना पहिल्या फेरीत बाय मिळाल्यामुळे त्यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -